झेपीच्या २७७ शाळांचा वीजपुरवठा सुरळीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झेपीच्या २७७ शाळांचा 
वीजपुरवठा सुरळीत
झेपीच्या २७७ शाळांचा वीजपुरवठा सुरळीत

झेपीच्या २७७ शाळांचा वीजपुरवठा सुरळीत

sakal_logo
By

पुणे, ता. २४ : महावितरणच्या पुणे परिमंडल अंतर्गत मुळशी, मंचर व राजगुरुनगर विभागातील जिल्हा परिषदेच्या २७७ शाळांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. वीजबिलांच्या थकबाकीमुळे या शाळांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला होता.
पुणे परिमंडल अंतर्गत मुळशी- ९०, मंचर- ८६ व राजगुरुनगर विभागांमध्ये १०१ अशा एकूण २७७ जिल्हा परिषद प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्यात आला होता. दरम्यान राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांच्या थकीत वीजबिलापोटी महावितरणला १४ कोटी १८ लाख रुपये देण्यात आले आहे. त्यानंतर संबंधित शाळांचा वीजपुरवठा तत्काळ जोडण्याचे निर्देश महावितरणकडून क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले. त्याप्रमाणे पुणे परिमंडल अंतर्गत तात्पुरत्या स्वरूपात वीजपुरवठा खंडित केलेल्या २७७ शाळांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top