पिकअप जीपच्या धडकेत दोन कामगार जागीच ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिकअप जीपच्या धडकेत
दोन कामगार जागीच ठार
पिकअप जीपच्या धडकेत दोन कामगार जागीच ठार

पिकअप जीपच्या धडकेत दोन कामगार जागीच ठार

sakal_logo
By

चाकण, ता. ९ : आंबेठाण-वराळे रस्त्यावर पिकअप जीपची धडक बसल्याने दुचाकीवरील दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जखमी झाला. आंबेठाण गावच्या हद्दीत राजमुद्रा ट्रेडर्ससमोर शनिवारी (ता. ८) हा अपघात झाला.

केतन माणिकराव धोंडगे (वय १९), विलास आनंदराव घुले (वय २२, दोघेही रा. झित्राईमळा, चाकण, ता. खेड), अशी मृतांची नावे आहेत. गोरख जकाते (रा. झित्राईमळा) हा तरुण या अपघातात जखमी झाला आहे. धोंडगे, घुले व जकाते हे तिघे वासुली (ता. खेड) येथील लुमॅक्स कंपनीत दुचाकीवरुन कामाला चालले होते. त्यावेळी वराळे बाजूकडून भरधाव वेगात येणाऱ्या पिकअपची त्यांच्या दुचाकीला समोरासमोर धडक बसली. याप्रकरणी पीकअपचा चालक राहुल पोपट वाळुंजकर (रा. बऊरगाव, ता. मावळ) याला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार, पोलिस उपनिरीक्षक विलास गोसावी यांनी दिली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top