भोलावडे येथील मंदिरावर पुष्पवृष्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोलावडे येथील मंदिरावर पुष्पवृष्टी
भोलावडे येथील मंदिरावर पुष्पवृष्टी

भोलावडे येथील मंदिरावर पुष्पवृष्टी

sakal_logo
By

भोर, ता. १९ः शहरालगत असलेल्या भोलावडे येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून यासाठी अडीच कोटी रुपये खर्च आला. आमदार संग्राम थोपटे व राजगड ज्ञानपीठाच्या सचिव स्वरूपा थोपटे यांच्या हस्ते मंदिरातील श्री भैरवनाथ, जोगेश्वरी, अंबामाता व श्रीगणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हेलिकॉप्टरमधून मंदिरावर करण्यात आलेली पुष्पवृष्टी हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.

कोरीव दगडात जीर्णोद्धार केलेल्या मंदिराचे पौराहित्य नारायणपूरचे नारायण महाराज, जेजुरीच्या कडेपठाराचे बाबाजी महाराज आणि वारकरी दिंडीचे सदा महाराज ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. जीर्णोद्धार कार्यक्रमात दिवसभर पुण्याहवाचन, मातृकापूजन, नवग्रह पूजन, मूर्तीअभिषेक व प्राणप्रतिष्ठा, होम-हवन, पूर्णाहुती आणि महाप्रसाद असे धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमास शिल्पकार हरिदास रोकडे, नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष चंद्रकांत मळेकर, गटनेते सचिन हर्णसकर, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार संचालक धनंजय वाडकर, अकुंश खंडाळे, बाळासाहेब थोपटे, के .डी सोनवणे, माजी नगरसेवक यशवंत डाळा, अमित सागळे आदी मान्यवर उपस्थित होते. जीर्णोद्धाराच्या दिवशी भोलावडेच्या ग्रामस्थांनी घरावर गुढ्या उभारल्या होत्या. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आमदार संग्राम थोपटे यांच्या फंडातून ५० लाख, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे यांच्या फंडातून ३० लाख आणि लोकवर्गणीतून १ कोटी ८० लाख रुपये जमा करण्यात आले.
PNE22S58257

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..