वाल्मीकी सोसायटीच्या अध्यक्षपदी मदन भुजबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाल्मीकी सोसायटीच्या अध्यक्षपदी मदन भुजबळ
वाल्मीकी सोसायटीच्या अध्यक्षपदी मदन भुजबळ

वाल्मीकी सोसायटीच्या अध्यक्षपदी मदन भुजबळ

sakal_logo
By

वाल्हे, ता. १: वाल्हे (ता. पुरंदर) येथील वाल्मीकी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी मदन शंकर भुजबळ व उपाध्यक्षपदी जयवंत बाबूराव भुजबळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या सोसायटीच्या सदस्यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली होती. शुक्रवारी (ता. १) सोसायटीच्या कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत श्रीखंडे यांच्या देखरेखीखाली निवडी करण्यात आल्या. अध्यक्षपदासाठी मदन भुजबळ व उपाध्यक्षपदासाठी जयवंत भुजबळ यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली. अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सरपंच अमोल खवले, गिरीश पवार, दत्तात्रेय पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आडाचीवाडीचे सरपंच दत्तात्रेय पवार, सूर्यकांत पवार, सुनील पवार, त्रिंबक भुजबळ, मारुती पवार, बजरंग पवार, भाऊसो भोसले, समदास भुजबळ, सूर्यकांत भुजबळ, सागर भुजबळ, दादासाहेब मदने आदि उपस्थित होते. बाळासाहेब राऊत यांनी प्रास्ताविक केले. दीपक कुमठेकर यांनी सूत्रसंचालन केले. राहुल जाधव यांनी आभार मानले.

PNE22S53593
PNE22S53594

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top