भोरमधील पाणवठ्यांची दुरुस्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोरमधील पाणवठ्यांची दुरुस्ती
भोरमधील पाणवठ्यांची दुरुस्ती

भोरमधील पाणवठ्यांची दुरुस्ती

sakal_logo
By

भोर, ता. ८ : भोर परिक्षेत्रातील हातनोशी, भाबवडी, खानापूर, वडगाव व उत्रौली आणि नसरापूर परिक्षेत्रातील किकवी, भोंगवली व धांगवडी या गावांजवळील वनक्षेत्रातील कृत्रीम पाणवठे पुन्हा सुरु केले आहेत. उन्हाळा असेपर्यंत या कृत्रीम पाणवठ्यांमध्ये नियमितपणे पाणी ओतले जाणार आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठीची भटकंती थांबणार आहे.
भोरच्या उपविभागीय वन अधिकारी आशा भोंग यांनी वन्य प्राण्यांकरीता पाण्याची सोय करण्याच्या सूचना दिल्यानंतर भोर वनपरिक्षेत्राचे रेंज अधिकारी दत्तात्रेय मिसाळ आणि नसरापूर वनपरिक्षेत्राचे संग्राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वन्यप्राण्यांसाठी पाण्याची सोय केली. गेल्यावर्षी तयार केलेल्या पाठवठ्यांची दुरुस्ती करून त्यामध्ये पाणी ओतले.
PNE22S55184

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top