कोरेगाव खुर्द येथील जलसाठे दूषित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरेगाव खुर्द येथील जलसाठे दूषित
कोरेगाव खुर्द येथील जलसाठे दूषित

कोरेगाव खुर्द येथील जलसाठे दूषित

sakal_logo
By

आंबेठाण, ता. ६ : वराळे परिसरात असणाऱ्या कंपन्यांच्या दूषित पाण्यामुळे कोरेगाव खुर्द (ता. खेड) येथील जलसाठे दूषित होत आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत असून कंपन्यांनी त्यांचे दूषित पाणी बाहेर सोडणे बंद करावे अशी मागणी कोरेगाव खुर्दचे सरपंच कैलास गाळव यांनी केली.
वराळे हे चाकण औद्योगिक वसाहत टप्पा क्रमांक दोनमधील गाव आहे. वराळे गावाच्या उत्तरेला कोरेगाव खुर्द गाव असून नैसर्गिक प्रवाहानुसार पावसाचे आणि कारखान्यातून सोडलेले पाणी कोरेगावच्या बाजूने जाते. परंतु, कारखान्यातून दूषित पाणी सोडले जात असल्याने हे पाणी विहीर, कूपनलिका यांच्या प्रवाहात जात असल्याने नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या उभ्या राहत आहे. तसेच दूषित पाण्याने ओढ्यातील पाणी देखील खराब होत असल्याने त्याचा परिणाम पिकांवर होत आहे. त्यामुळे वराळे आणि कोरेगाव गावच्या सीमेवर असणाऱ्या कारखान्यातून सोडण्यात येणारे दूषित पाणी थांबवावे, अशी मागणी गाळव यांच्यासह परिसरातील नागरिक करत आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Abt22b01466 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top