उद्योजकाने घडवली ४२ वर्गमित्रांना हवाईसफर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्योजकाने घडवली ४२ वर्गमित्रांना हवाईसफर
उद्योजकाने घडवली ४२ वर्गमित्रांना हवाईसफर

उद्योजकाने घडवली ४२ वर्गमित्रांना हवाईसफर

sakal_logo
By

आंबेठाण, ता. ७ : ज्यांच्या सोबत आपण लहानाचे मोठे झालो, ज्यांच्या सहवासात बालपण एकत्र गेले, अशा मित्र-मैत्रिणींना तब्बल ३३ वर्षांनंतर भेटण्याचा आनंद हा अवर्णनीयच आहे. याचेच औचित्य साधत चाकण-पिंपरी चिंचवड भागातील उद्योजक विलास जामदार यांनी त्यांच्या ४२ मित्र आणि मैत्रिणींना विमानाने हैदराबादची सफर घडवून आणली. देहू येथील संत तुकाराम विद्यालयात शिक्षण घेणारी सन १९८९ मधील बॅच नुकतीच एकत्र आली होती. त्यानंतर सर्वांचे एकत्रित संमेलन व्हावे, अशी सर्वांचीच इच्छा होती. त्याला जामदार यांच्या वाढदिवसामुळे बळ मिळाले. त्यांनी सर्व मित्रांना विमानाने हैदराबादची सफर घडवून आणली. या सहलीत जीवनात प्रथमच विमान प्रवास करणारे तब्बल ३६ मुले-मुली होत्या. प्रथमच विमानात प्रवास झाल्याने त्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता.

३६ जण पहिल्यांदाच विमानत
आयुष्याच्या उतारवयात म्हणजे पन्नाशीच्या उंबरठ्यावर असताना अनेक व्याधींनी आम्हाला गाठायला सुरुवात केली, तर काहींना गाठले होते. परंतु, ही सफर आम्हाला पुनर्जीवित करणारी ठरली. या काळात आम्ही बालपणसुद्धा जगलो, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. तसेच, ३६ जणांनी प्रथमच विमानात बसण्याचा आनंद घेतला.

मदतीसाठी नेहमीच पुढे
जामदार यांनी जवळपास ५५० तरुणांना नोकऱ्या देण्याचे काम केले आहे. त्यांनी कोरोना काळात गरजूंना धान्य व औषधे वाटप करण्यासह आरोग्य विषयक सेवा पुरविल्या. खेडमधील गाडकवाडी येथील शाळेला रंगकाम करण्यासह अन्य मदत केली. सामुदायिक विवाह सोहळ्यात जेवणाची व्यवस्था करण्यासह आर्थिक हातभार लावला आहे. निराधार मुलांच्या दवाखान्याचा खर्च केला. गरजू मुलांच्या शैक्षणिक खर्चास मदत केली. आर्थिक परिस्थिती कमकुवत असणाऱ्या मुला-मुलींच्या लग्नकार्यात मदत केली आहे. तसेच, अवसरी, शिंदेगाव, वराळे, आकुर्डी, निमगाव दावडी आदी भागात गणेश मंदिरांना मदत केली आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Abt22b01474 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top