
आसखेड सोसायटीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व
आंबेठाण, ता.१० : आसखेड खुर्द (ता.खेड) येथील विकास सोसायटीवर खेड तालुका राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष कैलास लिंभोरे पाटील यांनी एकहाती वर्चस्व निर्माण केले. मतदान झालेल्या ११ पैकी ११ जागा या राष्ट्रवादी काँग्रेसची विचारसरणी असलेल्या उमेदवारांनी मिळविल्या आहेत.त्यामुळे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या ताब्यात ही सोसायटी गेली आहे.
सोसायटीची सत्ता एकहाती ताब्यात घेतल्याने कैलास लिंभोरे पाटील यांचा बाजार समिती लढविण्याचा रस्ता खुला झाला आहे. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी हनुमंत लिंभोरे, बाळासाहेब लिंभोरे, नथुराम लिंभोरे, सचिन लिंभोरे, अशोक लिंभोरे, पोपट लिंभोरे, अशोक लिंभोरे यांनी प्रयत्न केले.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे : सर्वसाधारण कर्जदार प्रतिनिधी - कैलास शंकरराव लिंभोरे, दत्तात्रेय नथुराम लिंभोरे, पंढरीनाथ शंकर लिंभोरे, शिवाजी देवराम लिंभोरे, महादू रामभाऊ लिंभोरे, मारुती बबन लिंभोरे, भरत नामदेव लिंभोरे, माऊली दत्तात्रेय शिंदे.
इतर मागासवर्गीय प्रतिनिधी - प्रकाश शंकरराव लिंभोरे. महिला राखीव प्रतिनिधी - गुणाबाई वसंत लिंभोरे, सखूबाई दाजी लिंभोरे.
तीन भाऊ सोसायटीवर
कैलास लिंभोरे आणि प्रकाश लिंभोरे हे दोघे सख्खे भाऊ आणि दत्तात्रेय नथुराम लिंभोरे हे त्यांचे चुलत भाऊ या निवडणुकीत विजयी झाले. एकाच घरातील तीन उमेदवार विजयी झाल्याने या कुटुंबाची राजकीय ताकत पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत सर्वाधिक मतांनी विजयी झालेले कैलास लिंभोरे आणि मारुती लिंभोरे हे सलग चार वेळेस सोसायटीमध्ये संचालक म्हणून काम करणार आहेत.
02130
Web Title: Todays Latest District Marathi News Abt22b01475 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..