
भोसरी ते भामचंद्र विद्यालय बससेवेची मागणी
आंबेठाण, ता. १३ : नागरिकांची मोठी वर्दळ असणाऱ्या भोसरी ते भामचंद्र विद्यालय (ता. खेड) या मार्गावर बससेवा सुरू करावी अशी मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे क्रीडा समितीचे सभापती प्रा. उत्तम केंदळे यांनी पुणे महानगर परिवहन मंडळाकडे केली आहे. पिंपरी चिंचवड शहर आणि चाकण एमआयडीसी भाग या बससेवेने जोडला जाणार आहे.
ही बससेवा सुरू व्हावी यासाठी या मार्गावरील वराळे, आंबेठाण, भांबोली, वासुली या ग्रामपंचायतीने पत्राद्वारे पीएमपीएमएलकडे याबाबत मागणी केली आहे. भोसरी भागातून कामगार मोठ्या प्रमाणात चाकण एमआयडीसी भागात येत असतात. याशिवाय खेड तालुक्याच्या ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पुणे, पिंपरी, चिंचवड भागात ये-जा करतात. त्यांच्या दृष्टीने देखील ही बससेवा महत्त्वाची ठरणार आहे. भोसरी ते चाकण मार्गे आंबेठाण, वराळे आणि भामचंद्र विद्यालय या मार्गे ही बससेवा सुरू करावी अशी मागणी उत्तम केंदळे यांनी केली आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News Abt22b01479 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..