भांबोली स्मशानभूमीतील धातूच्या साहित्यांची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भांबोली स्मशानभूमीतील 
धातूच्या साहित्यांची चोरी
भांबोली स्मशानभूमीतील धातूच्या साहित्यांची चोरी

भांबोली स्मशानभूमीतील धातूच्या साहित्यांची चोरी

sakal_logo
By

आंबेठाण, ता. ६ : भांबोली (ता. खेड) येथील स्मशानभूमीमध्ये मयत जाळण्यासाठी असणाऱ्या बीड धातूच्या साहित्याची जाळी चोरट्यांनी चोरी केली. मयत ठेवण्यासाठी असणाऱ्या बीड धातूच्या १२ भागाचा यात समावेश आहे.
भांबोली गावच्या उत्तर पूर्वेला तळ्याच्या कडेला स्मशानभूमी आहे. रविवारच्या रात्री येथे चोरी झाल्याचे सोमवारी सकाळी लक्षात आले. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने म्हाळुंगे पोलिस चौकीत याबाबत तक्रार दिली. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पंचनामा केला आहे.
यावेळी सरपंच भरत लांडगे, एकनाथ राऊत, संभाजी कडाळे, शरद राऊत, भाऊसाहेब गायकवाड, महादू राऊत, संदीप राऊत, ग्रामसेवक विकास विसे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. यापूर्वी देखील या परिसरात शिंदेगाव येथील समशानभूमीमधील साहित्याची चोरी केली होती.

Web Title: Todays Latest District Marathi News Abt22b01499 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top