
‘भामा आसखेड’मध्ये ३३ टक्के पाणीसाठा
आंबेठाण, ता. १८ : खेड, शिरूरसह पुणे शहराला वरदान ठरलेल्या भामा आसखेड (ता. खेड) धरणात सध्या ३३.०८ टक्के (३.०१ टीएमसी) पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा साठा ५ टक्क्यांनी कमी आहे.
भामा आसखेड हे खेड तालुक्यातील पश्चिम भागात भामा नदीवर उभारलेले मातीचे धरण आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता ८.१४ टीएमसी इतकी आहे. चालू वर्षी धरण परिसरात १ जूनपासून १९ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, या भागात मॉन्सूनपूर्व पावसाने जवळपास दडीच मारली आहे. धरणात सध्या एकूण पाणीसाठा हा ३.०१ टीएमसी असून, उपयुक्त पाणीसाठा हा २.५४ टीएमसी इतका आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला धरणात ३८.२९ टक्के पाणीसाठा होता, तर यावर्षी हा साठा ५ टक्क्यांनी कमी होऊन ३३ टक्क्यांपर्यंत आला आहे. धरणातून मागील वर्षीपासून पुणे शहराच्या पूर्व भागासह आळंदीला पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा यावर्षी कमी आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News Abt22b01511 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..