आंबेठाणच्या सदस्यपदी आरडे, मांडेकर बिनविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबेठाणच्या सदस्यपदी 
आरडे, मांडेकर बिनविरोध
आंबेठाणच्या सदस्यपदी आरडे, मांडेकर बिनविरोध

आंबेठाणच्या सदस्यपदी आरडे, मांडेकर बिनविरोध

sakal_logo
By

आंबेठाण, ता. ४ : मॉडेल व्हिलेज आंबेठाण (ता. खेड) ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी आरती शहाजी आरडे आणि ज्योती संतोष मांडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची माहिती लोकनियुक्त सरपंच संघमित्रा नाईकनवरे आणि ग्रामविकास अधिकारी रवींद्र उगले यांनी दिली.
येथील वॉर्ड क्रमांक एकमधील सदस्य सारिका गणेश आरडे आणि वॉर्ड क्रमांक तीनमधील कल्पना चंद्रकांत आरडे यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली. ठरल्याप्रमाणे अन्य लोकांना सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळावी म्हणून हे राजीनामे दिले गेले.
या दोन्ही जागा सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी राखीव होत्या. निवडणूक शांततेत आणि बिनविरोध पार पाडण्यासाठी सरपंच नाईकनवरे, उपसरपंच तुळसाबाई घाटे, दत्तात्रेय मांडेकर, शांताराम चव्हाण, लक्ष्मण भालेराव, दत्तात्रेय नाईकनवरे, अहिल्या पडवळ, अमोल दवणे, रूपाली मांडेकर, रूपाली गोणते यांच्यासह ग्रामस्थांनी प्रयत्न केले.

Web Title: Todays Latest District Marathi News Abt22b01520 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top