आंबेठाण येथे शोषखड्ड्यात पडून तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबेठाण येथे शोषखड्ड्यात पडून तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू
आंबेठाण येथे शोषखड्ड्यात पडून तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू

आंबेठाण येथे शोषखड्ड्यात पडून तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू

sakal_logo
By

आंबेठाण, ता. १७ : कोरेगाव खुर्द (ता. खेड) येथे संडाससाठी खोदलेल्या शोषखड्ड्यात पडून तीन वर्षांच्या गाथा नितीन कडुसकरचा मृत्यू झाला. एकुलत्या एका मुलीचा असा अपघाती मृत्यू झाल्याने कडुसकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यापूर्वी अवघ्या चार दिवसांपूर्वी आंबेठाण येथे अशाच प्रकारे झालेल्या घटनेत एकाच कुटुंबातील सख्या दोन भावांचा आणि एका बहिणीचा मृत्यू झाला होता.
कोरेगाव खुर्द येथील माळवाडी भागात राहणाऱ्या कडुसकर कुटुंबाने घराच्या उत्तर बाजूला संडास बांधकाम करण्यासाठी शोषखड्डा खोदला होता. काही दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने खड्ड्यात पाणी साचले होते परिणामी बांधकाम बंद होते.
घरात ही मुलगी कागदाबरोबर खेळत होती. खेळता खेळता ही चिमुकली खड्ड्याजवळ गेली आणि पाण्यात पडली. बराच वेळ दिसली नाही म्हणून शोध घेतला असता खड्ड्यात साचलेल्या पाण्यात ती खेळत असलेला कागद पाण्यावर तरंगताना दिसला त्यावरून पाण्यात मुलगी असल्याचा अंदाज येऊन शोध घेतला असता ती पाण्यात आढळून आली.

Web Title: Todays Latest District Marathi News Abt22b01531 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top