भामा आसखेडमधून विसर्ग सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भामा आसखेडमधून विसर्ग सुरू
भामा आसखेडमधून विसर्ग सुरू

भामा आसखेडमधून विसर्ग सुरू

sakal_logo
By

आंबेठाण, ता. १० : खेड, शिरुरसह पुणे महानगरपालिकेला वरदान ठरलेले भामा आसखेड (ता. खेड) धरण आज (ता. १०) दुपारी दोन वाजता पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे धरणाच्या चारही दरवाजातून भामा नदीपात्रात ६२० क्युसेक वेगाने विसर्ग सोडण्यात आला आहे.
भामा आसखेड हे खेड तालुक्यातील पश्चिम भागात भामा नदीवर उभारलेले मातीचे धरण आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता ८.१४ टीएमसी इतकी आहे. चालू वर्षी धरण परिसरात १ जून पासून ७१८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आज सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत धरण परिसरात ३९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
सद्या धरणाच्या सांडव्याच्या चारही दरवाजातून ६२० क्युसेकने विसर्ग सुरू असून त्यासाठी दरवाजे ५ सेंमीने वर उचलण्यात आले आहेत.
धरणात सध्या एकूण पाणीसाठा हा शंभर टक्के म्हणजे ८.१४ टीएमसी असून उपयुक्त पाणीसाठा हा ७.६७ टीएमसी इतका आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला धरणात ८७.७१ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. पावसाचे प्रमाण असेच राहिले तर धरणातून विसर्ग अजून वाढवावा लागेल अशी माहिती भामा आसखेड धरण प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी तुळशीराम आंधळे, शाखा अभियंता नीलेश घारे-देशमुख आणि कालवा निरीक्षक वसंत ढोकरे यांनी दिली आहे. त्यामुळे पुढील काळात नदीकाठच्या नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Abt22b01556 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..