गोनवडी येथे विधवांच्या हस्ते ध्वजवंदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोनवडी येथे विधवांच्या हस्ते ध्वजवंदन
गोनवडी येथे विधवांच्या हस्ते ध्वजवंदन

गोनवडी येथे विधवांच्या हस्ते ध्वजवंदन

sakal_logo
By

आंबेठाण, ता. १६ : गोनवडी (ता. खेड) येथे विधवा महिलांच्या हस्ते ध्वजवंदन करून गावाने आदर्श निर्माण केला आहे. सरपंचपद मिळाल्यानंतर अनेकांना आपल्याला ध्वजवंदन करण्याचा मान मिळावा अशी अपेक्षा असते. परंतु, गावचे सरपंच संदीप मोहिते-पाटील यांनी विधवा महिलांना हा सन्मान दिला. येथील कलावती साहेबराव तनपुरे, चांगुणाबाई टाकळकर, कमल मोहिते, सुनीता मोहिते, संगीता मोहिते यांना ध्वजवंदन करण्याचा मान मिळाला. या प्रसंगी संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक दिनेश मोहिते-पाटील यांच्यासह उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Abt22b01561 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..