भामा आसखेडचे जलपूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भामा आसखेडचे जलपूजन
भामा आसखेडचे जलपूजन

भामा आसखेडचे जलपूजन

sakal_logo
By

आंबेठाण, ता. १७ : भामा आसखेड (ता. खेड) धरणाचे जलपूजन आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मागील वर्षीपेक्षा यावर्षी धरण थोडे उशिरा भरले आहे.

याप्रसंगी भामा आसखेड धरणाचे उपविभागीय अधिकारी तुळशीदास आंधळे, शाखाधिकारी नीलेश घारे-देशमुख, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष जयसिंग दरेकर, कैलास लिंभोरे पाटील, कालवा निरीक्षक वसंत ढोकरे, गुलाब शिवेंकर, अश्विनी रौधळ, कैलास पडवळ, संदीप बधाले, रमेश बोऱ्हाडे यांच्यासह तालुक्यातील पश्चिम भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.

धरण परिसरात आजपर्यंत ८०१ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे, तसेच आज दुपारी १.३० वाजता भामा आसखेड प्रकल्पातून भामा नदी पात्रात होत असलेला विसर्ग ५४८ क्युसेकवरून वाढवून ११२५ क्यूसेस एवढा करण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे, कमी करण्याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. तरी कृपया नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ हलविण्यात यावीत, असे आवाहन भामा आसखेड धरण प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------

Web Title: Todays Latest District Marathi News Abt22b01562 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..