भामा आसखेड धरणातून १२०७ क्यूसेकने विसर्ग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भामा आसखेड धरणातून
१२०७ क्यूसेकने विसर्ग
भामा आसखेड धरणातून १२०७ क्यूसेकने विसर्ग

भामा आसखेड धरणातून १२०७ क्यूसेकने विसर्ग

sakal_logo
By

आंबेठाण, ता. १३ : भामा आसखेड (ता. खेड) धरणातून सुरू असलेला विसर्ग वाढविण्यात आला असून, सध्या धरणाच्या चारही दरवाजांतून १२०७ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. त्यासाठी धरणाचे दरवाजे दहा सेंटीमीटरने वर उचलण्यात आले आहेत .धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी जास्त होत असल्याने विसर्ग कमी-जास्त केला जात आहे. सुरवातीला हा विसर्ग ६०४ क्यूसेकने सुरू होता. त्यांनतर त्यात वाढ केली आहे.
खेड, शिरूरसह पुणे महापालिकेला वरदान ठरलेल्या भामा आसखेड (ता. खेड) धरणात सध्या ९८.५९ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी धरणात ९६.४२ टक्के पाणीसाठा होता. धरणाची पाणी साठवण क्षमता ८.१४ टीएमसी इतकी आहे. चालू वर्षी धरण परिसरात १ जूनपासून १०२७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. धरणात सध्या एकूण पाणीसाठा ८.०४ टीएमसी म्हणजे ९८.५९ टक्के असून, उपयुक्त पाणीसाठा ७.५६ टीएमसी इतका आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला धरणात ९६.४२ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.
पावसाचे प्रमाण असेच राहिले तर धरणातून विसर्ग अजून वाढवावा लागेल, अशी माहिती भामा आसखेड धरण प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी तुळशीदास आंधळे, शाखा अभियंता नीलेश घारे-देशमुख आणि कालवा निरीक्षक वसंत ढोकरे यांनी दिली.

Web Title: Todays Latest District Marathi News Abt22b01575 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..