रोहकलच्या सरपंचपदी प्रमिला काचोळे पाटील विजयी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोहकलच्या सरपंचपदी प्रमिला काचोळे पाटील विजयी
रोहकलच्या सरपंचपदी प्रमिला काचोळे पाटील विजयी

रोहकलच्या सरपंचपदी प्रमिला काचोळे पाटील विजयी

sakal_logo
By

आंबेठाण, ता. १९ : जनतेतून सरपंच निवड होत असलेल्या रोहकल (ता. खेड) येथील ग्रामपंचायतीच्या प्रथम लोकनियुक्त सरपंचपदी प्रमिला संदीप काचोळे पाटील यांची बहुमताने निवड झाली.
रोहकल येथील सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होते. तिरंगी झालेल्या या लढतीत प्रमिला काचोळे यांना ३५४ अशी सर्वाधिक मते मिळाली. तर, वंदना विकास काचोळे यांना २५० मते व रंजना काळूराम ठोंबरे यांना २६९ मते मिळाली.
वॉर्ड क्रमांक एक येथील अनुसूचित जाती या जागेसाठी झालेल्या लढतीत संजय लक्ष्मण गायकवाड हे २०६ मते मिळवून विजयी झाले. त्यांनी संतोष किसन गायकवाड (१६० मते) यांचा पराभव केला. तर, अनुसूचित जमाती महिला ही जागा रिक्त राहिली. सर्वसाधारण महिला या गटातून छाया दिलीप काचोळे यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे.
वॉर्ड क्रमांक दोनमध्ये रेश्मा राजेंद्र शिंदे यांची बिनविरोध झाली आहे. तर, सर्वसाधारण जागेसाठी झालेल्या चौरंगी लढतीत सुनील मोतीराम ठोंबरे (१४४ मते ) हे विजयी झाले. सुनील रघुनाथ ठोंबरे (६५ मते), अशोक शंकर गायकवाड (१२ मते) आणि संदीप चंद्रकांत काचोळे (३ मते) यांचा येथे पराभव झाला.
वॉर्ड क्रमांक तीनमध्ये तुषार छबन काळे हे बिनविरोध विजयी झाले. तर, याच वॉर्डात सर्वसाधारण महिला या जागेसाठी झालेल्या दुरंगी लढतीत प्रणिता सचिन ठोंबरे यांनी २१२ मते मिळवून रेश्मा गणेश ठोंबरे (६४ मते) यांचा पराभव केला.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून चाकणचे मंडलाधिकारी गणेश सोमवंशी आणि सहायक अधिकारी म्हणून तलाठी सचिन जाधव यांनी काम पाहिले.

माझे पती संदीप यांनी आजपर्यंत नागरिकांना आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, बँक खाती, पोस्ट खाते संबंधित योजना, श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना याबाबत नागरिकांना मागील पाच वर्षात केलेल्या कामाची ही पोच पावती आहे. जनतेचा विश्वास सार्थ ठरवू.
- प्रमिला काचोळे पाटील,
नवनिर्वाचित सरपंच, रोहकल (ता. खेड)

प्रमिला काचोळे पाटील

Web Title: Todays Latest District Marathi News Abt22b01581 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..