राजमाता जिजाऊ महिला संस्थेतर्फे निराधार महिलांना साड्यांचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजमाता जिजाऊ महिला संस्थेतर्फे 
निराधार महिलांना साड्यांचे वाटप
राजमाता जिजाऊ महिला संस्थेतर्फे निराधार महिलांना साड्यांचे वाटप

राजमाता जिजाऊ महिला संस्थेतर्फे निराधार महिलांना साड्यांचे वाटप

sakal_logo
By

आंबेठाण, ता. ३ : नवरात्र महोत्सवात देवीच्या चरणाशी अर्पण केलेल्या साड्या जमा करून त्या गरीब, निराधार महिला व महिला पोलिस कर्मचाऱ्यांना वाटप करण्याचा अनोखा उपक्रम राजमाता जिजाऊ महिला संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात आला आहे. जिल्ह्याच्या विविध भागातून जवळपास ५०० साड्या अशाप्रकारे जमा करून त्यांचे वाटप करण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे. हा महोत्सव करण्यासाठी संस्थेच्या सदस्य महिलांनी एक मेसेज तयार करून व्हॉट्सअपच्या ग्रुपवर पाठवण्यात आला.
खेड, आंबेगाव, मावळ या तालुक्यांसह मुंबई, पिंपरी-चिंचवड या भागातून जवळपास ५०० साड्या जमा झाल्या होत्या. या साड्या जमा झाल्यानंतर त्यात ओटी भरून साडी अर्पण महोत्सवास सुरुवात केली. प्रथम सुरुवात चाकण येथील एसटी स्टँड येथून करण्यात आली. या ठिकाणी जवळपास ४० ते ५० भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना साडी व फळ वाटप करण्यात आली. तसेच म्हाळुंगे पोलिस स्टेशन येथील महिला पोलिस कर्मचाऱ्यांची साडी-चोळी देऊन ओटी भरण्यात आली. त्यानंतर वासुली येथील ठाकरवाडी येथे साडी अर्पण महोत्सव पार पडला. त्यानंतर रोहकल येथील पूर्व ठाकरवाडी येथे साडी वाटप करण्यात आले.
नवरात्र महोत्सवानंतर उरलेल्या साड्या देवदासी महिला, पोतराज महिला यांना वाटण्यात येणार असल्याचे रत्ना पिंगळे-देशमुख यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे नियोजन राजमाता जिजाऊ महिला संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष रत्नाताई पिंगळे-देशमुख यांच्यासह उपाध्यक्ष उषा पावडे, सोनल टाकळकर, कल्पना पवार, योगिनी जगनाडे आदींनी केले होते. तर विविध ठिकाणी साडी वाटपप्रसंगी नीतू सिंग, रंभा सिंग, शरद वाडीले, रोहकलचे माजी सरपंच अमृत ठोंबरे, माधुरी कानमुडे, ज्योती गावडे आदी उपस्थित होते.