महिला अत्याचाराविरोधात बोरदरामध्ये दुर्गादौड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला अत्याचाराविरोधात
बोरदरामध्ये दुर्गादौड
महिला अत्याचाराविरोधात बोरदरामध्ये दुर्गादौड

महिला अत्याचाराविरोधात बोरदरामध्ये दुर्गादौड

sakal_logo
By

आंबेठाण, ता. ६ : बोरदरा (ता. खेड) येथे नवरात्र उत्सवानिमित्त दसऱ्याच्या दिवशी दुर्गादौड काढण्यात आली. महिलांवरील होत असलेले अन्याय, अत्याचार यावर घोषणा देत गावामध्ये जनजागृती करीत प्रभात फेरी काढण्यात आली. या दुर्गादौडचे नियोजन बोरदरा गावातील महिलांनी केले होते.

‘जय जिजाऊ जय शिवराय’, ‘बेटी बढाओ... बेटी पढाव’, ‘पहिली बेटी..धनाची पेटी’, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा देत टाळ-मृदुंगाच्या गजरात ही दुर्गादौड काढण्यात आली.

या दौडमध्ये अक्षदा पडवळ, मोनाली पडवळ, सुनंदा पडवळ, शुभांगी पडवळ, मनिषा पडवळ, वैशाली पडवळ, जानता पडवळ, ताराबाई पडवळ, रूपाली पडवळ, सुभद्रा पडवळ, गीता पडवळ, मंगल पडवळ, शिल्पा पडवळ, भारती पडवळ, सीमा पडवळ, माया पडवळ, अलका पडवळ, लंका पडवळ, दिव्या पडवळ, सुजाता पडवळ, दीपाली पडवळ आदी महिला आणि मुलींनी सहभाग घेतला होता.
ग्रामपंचायत सदस्या रोहिणी पडवळ यांनी आभार मानले.
-------------------