शरद बुट्टेपाटील ः भौतिक विकासापेक्षा शाश्वत विकास जास्त गरजेचा वराळेत सरपंच, ग्रामसेवकांना मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शरद बुट्टेपाटील ः भौतिक विकासापेक्षा शाश्वत विकास जास्त गरजेचा
वराळेत सरपंच, ग्रामसेवकांना मार्गदर्शन
शरद बुट्टेपाटील ः भौतिक विकासापेक्षा शाश्वत विकास जास्त गरजेचा वराळेत सरपंच, ग्रामसेवकांना मार्गदर्शन

शरद बुट्टेपाटील ः भौतिक विकासापेक्षा शाश्वत विकास जास्त गरजेचा वराळेत सरपंच, ग्रामसेवकांना मार्गदर्शन

sakal_logo
By

आंबेठाण, ता. १५ : ‘‘पंधराव्या वित्त आयोग निधीतून केवळ भौतिक विकासाची कामे न करता मानवी विकास आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या उपाययोजना करण्याची गरज आहे,’’ असे मत माजी जिल्हा परिषद सदस्य तथा पंचायत राज व्यवस्थेचे अभ्यासक शरद बुट्टेपाटील यांनी व्यक्त केले.
आमचं गाव - आमचा विकास या संकल्पनेतून पंधराव्या वित्त आयोगाचा पुढील वर्षाचा आराखडा तयार करण्यासाठी वराळे येथे झालेल्या कार्यशाळेत सरपंच व ग्रामसेवक यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यात नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा, शुद्ध मुबलक पिण्याचे पाणी, स्थानिक संसाधनातून रोजगार निर्मिती, लिंगसमानता, नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढवणे, दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना दारिद्र्यरेषेच्या वर आणणे, विद्यार्थ्यांना गुणवत्तेचे शिक्षण देणे यासाठी काम करावे लागणार असून यामधील काही काम डोळ्यांना दिसणारे नसले तरी त्यातून होणारे बदल हे शाश्वत आहेत. अन्य भौतिक विकासाच्या कामासाठी जिल्हा परिषदेकडे अनेक योजना आहेत. केंद्र सरकारने ग्रामपंचायतीला उपलब्ध करून दिलेला निधी हा या भौतिक विकासावर खर्च न करता गावातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी खर्च करण्याची सरकारची सूचना आहे,’’ असे ते म्हणाले.
   ‘‘गावातील ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, प्राथमिक शाळेचे शिक्षक, आरोग्य केंद्रांचे कर्मचारी, अंगणवाडीचे पशुवैद्यकीय डॉक्टर्स, महिला स्वयंसहायता बचत गट, युवक मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ, अनुसूचित जाती जमातीचे नागरिक व शेतकरी या सर्व घटकांच्या सूचना घेऊन गावाचा विकास आराखडा तयार केल्यास तो अधिक लोकहिताचा होईल. यासाठी सरपंचांनी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून सर्वांना सोबत घेतले पाहिजे,’’ असे ही ते म्हणाले. वराळे येथील प्रशिक्षण विस्तार अधिकारी एस. एस. थोरात तसेच कान्हेवाडीचे माजी सरपंच भाऊसाहेब पवार उपस्थित होते.