वराळेच्या उपसरपंचपदी बाळासाहेब ठाकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वराळेच्या उपसरपंचपदी बाळासाहेब ठाकर
वराळेच्या उपसरपंचपदी बाळासाहेब ठाकर

वराळेच्या उपसरपंचपदी बाळासाहेब ठाकर

sakal_logo
By

आंबेठाण, ता. १८ : वराळे (ता. खेड) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बाळासाहेब दाजी ठाकर यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच दिनेश लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. उपसरपंच सुनीता मोहन ठाकर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त जागेसाठी निवडणूक घेतली त्यावेळी ठाकर यांची निवड झाल्याचे जाहीर केले.
येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात उपसरपंच पदासाठी पार पडलेल्या या निवडणुकीत सरपंच दिनेश लांडगे, यांच्यासह मावळत्या उपसरपंच सुनीता ठाकर, पूजा बुट्टेपाटील, उज्ज्वला चव्हाण, अविनाश लोंढे, शुभांगी बुट्टेपाटील आदी उपस्थित होते. निवडणुकीचे कामकाज ग्रामसेवक विकास विशे यांनी पाहिले.