वाकी बुद्रुक येथे गाईचे ओटीभरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाकी बुद्रुक येथे गाईचे ओटीभरण
वाकी बुद्रुक येथे गाईचे ओटीभरण

वाकी बुद्रुक येथे गाईचे ओटीभरण

sakal_logo
By

आंबेठाण, ता. २४ : मातृत्व हा जीवनातील सुंदर अनुभव असतो मग ती महिला असो किंवा पशू पक्षी. जर एखाद्या कुटुंबातील महिला गर्भवती असेल तर संपूर्ण कुटुंबच तिचे कोड-कौतुक करीत असते. अगदी ओटीभरणापासून ते बाळंतपण होईपर्यंत काळजी घेतली जाते. परंतु, गोठ्यातील गाय गाभण असल्याने तिचे डोहाळे जेवण करून घरातील महिलेप्रमाणे काळजी घेण्याचे काम खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथील टोपे कुटुंब करीत आहे.
वाकी बुद्रुक येथील शेतकरी मोहन निवृत्ती टोपे यांनी त्यांच्या ‘गुड्डी’ नावाच्या गायीचेही डोहाळे जेवण करीत गायीच्या मातृत्वाचा उत्सवच जणू साजरा केला आहे.
टोपे कुटुंबाचे त्यांच्याकडे असणाऱ्यांनी गाई-बैलांवर जिवापाड प्रेम आहे. मोहन टोपे यांचा मुलगा योगेश यांनी त्यांच्या वडिलांनी आणलेल्या गुड्डी नावाच्या गाईवर खूप प्रेम. अगदी तिच्या आंघोळीपासून सर्व गोष्टींचा काळजी योगेश स्वतः घेतात. गाईवर नितांत प्रेम असणाऱ्या मोहनराव यांच्या गाईला सध्या दिवस गेले असून नववा महिना सुरू आहे. महिलांचे जसे ओटी भरण होते. त्यापद्धतीने टोपे कुटुंबांनी आपल्या पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळलेल्या गाईच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्याचा बेत आखला आणि त्या कार्यक्रमाला ‘शिवार-ओटीभरण’ असे नाव देऊन मित्र परिवार व आप्तेष्टांना निमंत्रण धाडले. डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमानिमित्त त्यांनी आपल्या गाईला छान सजवले. मासवडी, जिलेबी, लाडू, तळलेले पदार्थ, फळे अशा पदार्थांची मेजवानी उपस्थितांसाठी ठेवण्यात आली. इतकंच नव्हे तर डोहाळे जेवण्याच्या निमित्ताने कार्यक्रमाला हजर असलेल्या मित्र परिवार आणि नातेवाइकांना गाय-वासराच्या लहान मूर्ती भेट देण्याचा कार्यक्रम देखील पार पडला. गाईचे औक्षण आणि सर्व विधी देखील अगदी दिमाखात पार पडले.