किल्ले बनवा स्पर्धेत वेदांत, आर्यन प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किल्ले बनवा स्पर्धेत वेदांत, आर्यन प्रथम
किल्ले बनवा स्पर्धेत वेदांत, आर्यन प्रथम

किल्ले बनवा स्पर्धेत वेदांत, आर्यन प्रथम

sakal_logo
By

आंबेठाण, ता. २९ : दिवाळीचे औचित्य साधत तीर्थक्षेत्र येलवाडी (ता. खेड) येथे किल्ले बनवा स्पर्धा घेण्यात आली. यात ६० स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत मोठ्या गटात वेदांत गाडे व लहान गटात आर्यन गाडे याने प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेतील सर्व सहभागी मुलांसाठी मोफत सिंहगड ट्रिपचे आयोजन करण्यात आले होते.
शिवजयंती उत्सव समिती यांच्या माध्यमातून या स्पर्धा घेण्यात आल्या तर जीवन नाना बोत्रे यांनी स्पर्धेत सहभागी मुलांना सिंहगड ट्रीप घडवून आणली. या सिंहगड ट्रिपमध्ये मुलांच्या जाण्या-येण्याचा खर्च, नाश्ता, जेवणाची व्यवस्था जीवन बोत्रे यांनी केली होती.
स्पर्धेमध्ये लहान गट व मोठा गट असे प्रत्येकी तीन नंबर काढून प्रत्येक विजेत्यास जीवन बोत्रे यांच्या वतीने प्रत्येकी एक हजार रुपयाचे पारितोषिक देण्यात आले.
मोठ गट - (आठवी ते बारावी)
पहिला क्रमांक - वेदांत नीलेश गाडे
दुसरा क्रमांक - यश शिवाजी बोत्रे
तिसरा क्रमांक - यश संतोष बोत्रे
लहान गट - (चौथी ते सातवी)
पहिला क्रमांक - आर्यन गणेश गाडे
दुसरा क्रमांक - कृष्णा विजय बोत्रे
तिसरा क्रमांक - आदित्य/आर्यन नितीन कदम