भामचंद्र विद्यालयात हस्तकला प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भामचंद्र विद्यालयात हस्तकला प्रदर्शन
भामचंद्र विद्यालयात हस्तकला प्रदर्शन

भामचंद्र विद्यालयात हस्तकला प्रदर्शन

sakal_logo
By

आंबेठाण, ता.२२ : भांबोली(ता.खेड) येथील भामचंद्र विद्यालयात हस्तकलेचे प्रदर्शन उत्साहात पार पडले. शालेय अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या विविध सुप्तगुणांचा आणि कौशल्याचा विकास व्हावा या उद्देशाने हे प्रदर्शन पार पडले. यात ५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. तसेच ‘टाकाऊ पासून टिकाऊ’ या कला शिक्षक विशाल राजगुरू यांच्या कल्पनेतून कल्पक आणि सुंदर वस्तू बनविल्या. यामध्ये विद्यार्थ्यांनी हाताने बनविलेली फुले, नक्षीकाम, सुंदर फुलदाणी बनवून त्यास फ्रेम बनविणे, आदी कलाकुसरीच्या वस्तूंचा समावेश होता.
प्रथम क्रमांक : समीक्षा कचाटे, राजवर्धन काळे, द्वितीय क्रमांक : इशिका साळुंखे, शिवांशी हेरलगी तृतीय क्रमांक : रोहन गाळव, वेदांती वाबळे, चतुर्थ क्रमांक : श्रेया गाळव, संग्राम पडवळ, पाचवा क्रमांक : समर्थ वाघमारे, श्रावण शिंदे यांना मिळाला. विद्यालयाचे प्राचार्य संजय बोरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षक शिवाजी गव्हाणे, सांस्कृतिक विभाग प्रमुख चंद्रकांत बुट्टे, रोहिदास लोहकरे आदी शिक्षक उपस्थित होते.
ssociated Media Ids : ABT22B02414