Mon, Jan 30, 2023

आंबेठाण येथे विकासकामांचे भूमिपूजन
आंबेठाण येथे विकासकामांचे भूमिपूजन
Published on : 18 December 2022, 12:57 pm
आंबेठाण, ता.१८ : आंबेठाण (ता.खेड) येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन सरपंच संघमित्रा नाईकनवरे यांच्या हस्ते करण्यात आले. येथील महालक्ष्मी मंदिर ते गाव ओढा या अंतरात १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून बंदिस्त गटार केले जाणार असून त्यासाठी पाच लक्ष रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
याशिवाय दवणे वस्ती ते महिंद्रा कंपनी या अंतरात देखील बंदिस्त गटार योजना राबविली जाणार असून त्यासाठी १० लक्ष रुपयांचा ग्रामनिधी टाकण्यात आला आहे.
याप्रसंगी सरपंच संघमित्रा नाईकनवरे, उपसरपंच दत्तात्रेय नाईकनवरे, महादू पानसरे, ज्ञानेश्वर चव्हाण, भिवराम पडवळ, मनोहर कुलकर्णी, ग्रामविकास अधिकारी रवींद्र उगले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
02453