
चैताली शिवेकर ठरल्या पैठणीच्या मानकरी
आंबेठाण, ता.११ : वाकीतर्फे वाडा (ता.खेड) येथे घेण्यात आलेल्या खेड रंगला पैठणीचा या कार्यक्रमात चैत्राली शशिकांत शिवेकर यांनी बाजी मारत मानाची पैठणी आणि फ्रिज अशी बक्षीसे पटकावली. खेड तालुक्याच्या पश्चिम भागात प्रथमच महिलांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमास महिलांची मोठी उपस्थिती होती. यावेळी पश्चिम मावळ भागातील सुमारे सातशे महिला उपस्थित होत्या.
वाकीतर्फे वाडा गावचे माजी उपसरपंच विश्वास शिवेकर यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पाईट, शिवे, करंजविहिरे, तोरणे, अहिरे, देशमुखवाडी, धामणे, वहागाव, कोये आदी भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
याशिवाय सपना अनिल कोळेकर,नी लम नीलेश पापळ, कुंदा अमोल सावंत, अश्विनी बाजीराव केदारी, अल्पना सचिन रायकर,अक्षदा श्रीकांत कदम यांना वस्तुरूपी बक्षीसे देण्यात आली.
याशिवाय सोनल गोपाळे, हर्षदा कोळेकर, काजल खेंगले, सुनीता शिवेकर, ऐश्वर्या जाधव, स्वाती पवार, रूपाली घोजगे, पूजा साळुंखे, केतकी पोमण, रंजना सातपुते या लकी ड्रॉमध्ये विजेत्या ठरलेल्या महिलांना साडी वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, अतुल देशमुख, नितीन गोरे, अनिल राक्षे, अमोल पवार, कैलास सांडभोर, चांगदेव शिवेकर, रोहिदास गडदे, कैलास लिंभोर, अमोल पानमंद, काळुराम पिजण, सुनील देवकर, सुभाष मांडेकर, दत्तात्रेय मांडेकर, भानुदास दवणे, सुनीता बुट्टेपाटील, मनसेचे तालुकाध्यक्ष संदीप पवार, विश्वास बुट्टेपाटील, दत्तात्रेय टेमगिरे, शरद निखाडे आदी उपस्थित होते.
प्रा.चिंतामण शिवेकर वअमोल डावरे यांनी सूत्रसंचालन तर विश्वनाथ शिवेकर, मारुती कोळेकर यांनी आभार मानले.
विजेत्या ठरलेल्या महिला पुढीलप्रमाणे
प्रथम क्रमांक - चैताली शशिकांत शिवेकर (पैठणी, फ्रिज), दुसरा क्रमांक - सुवर्णा सागर पडवळ (एलईडी टीव्ही), तिसरा क्रमांक - रूपाली युवराज कड (मेकअप आरसा), चौथा क्रमांक - स्नेहा अविनाश शिवेकर (कुलर फॅन), पाचवा क्रमांक - हर्षदा सुभाष कोळेकर (मिक्सर).
02532