पिंपरी बुद्रुक येथे माजी विद्यार्थी मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी बुद्रुक येथे माजी विद्यार्थी मेळावा
पिंपरी बुद्रुक येथे माजी विद्यार्थी मेळावा

पिंपरी बुद्रुक येथे माजी विद्यार्थी मेळावा

sakal_logo
By

आंबेठाण, ता. १६ : चोवीस वर्षे मनात साठवून ठेवलेल्या शालेय जीवनातील आठवणींना मनसोक्त गप्पांच्या माध्यमातून मोकळी वाट करून देण्याचा प्रयत्न पिंपरी बुद्रुक (ता. खेड) येथील तत्कालीन दहावीच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. याला निमित्त होते होते ते स्नेहसंमेलनाचे.
पिंपरी बुद्रुक येथील श्री. सुमंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये १९९८ मध्ये दहावीचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचे चाकण येथे स्नेहसंमेलन पार पडले. या वेळी गुरूजनांप्रती आदरभावना व्यक्त करीत त्यांचे पूजन करून प्रार्थना घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे निवृत्त प्राचार्य गवारी होते. या वेळी तत्कालीन गुरूजनांपैकी कर्डिले, ढमाले, करमारे, देशमुख, यादव, खामकर, जाधव, रासकर, गवळे उपस्थित होते. याप्रसंगी स्नेहभोजनासमवेत शालेय जीवनात केलेल्या सर्व गमतीजमतींचा मनमुराद आनंद घेतला.
स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी विजय तनपुरे, हनुमंत गोणते, शरद पवार, अनिल ठाकूर, नवनाथ हुंडारे, शंकर पडवळ, सविता वाळुंज, सुनीता ठाकूर, सुवर्णा भुजबळ, उज्वला हुंडारे यांनी महत्त्वाचे योगदान दिले.
या वेळी सूत्रसंचालन संतोष एरंडे यांनी केले. पसायदानाने स्नेहमेळाव्याची सांगता झाली.