आंबेठाण येथे वर्गखोल्यांचे भूमिपूजन

आंबेठाण येथे वर्गखोल्यांचे भूमिपूजन

आंबेठाण, ता. १७ : स्मार्ट व्हिलेज ठरलेल्या आंबेठाण (ता. खेड) येथे ॲप्टिव्ह इंडिया कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून उभारल्या जात असलेल्या दोन वर्गखोल्यांचे भूमिपूजन करण्यात आले.
माजी सरपंच दत्तात्रेय भेगडे आणि आंबेठाण ग्रामपंचायत यांच्या विशेष प्रयत्नातून दवणेवस्ती येथील जिल्हा परिषद शाळेकरिता या खोल्या मंजूर झाल्या आहेत. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी रघू कौशिक यांच्या हस्ते या वर्गखोल्यांचे भूमिपूजन करण्यात आले.
याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच संघमित्रा नाईकनवरे, माजी सरपंच दत्तात्रेय भेगडे, अनिल भोईटे, प्रशांत पाटील, शाहरुख पटेल, इक्बाल शेख, दत्तात्रेय मांडेकर, सुभाष मांडेकर, शांताराम चव्हाण, भानुदास दवणे, दत्तात्रेय नाईकनवरे, अमोल दवणे, आरती आरडे, मुख्याध्यापक रत्नप्रभा वाळुंज यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक माजी सरपंच सुभाष मांडेकर यांनी केले. तर आभार सरपंच संघमित्रा नाईकनवरे यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com