आंबेठाण येथे रामनवमी उत्साहात

आंबेठाण येथे रामनवमी उत्साहात

आंबेठाण, ता. ३० : राम जन्मला ग सखे..... राम जन्मला.....असा जयघोष करत आंबेठाण (ता. खेड) येथे रामनवमी साजरी करण्यात आली. तब्बल सव्वादोनशे वर्षाची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या येथील श्रीराम मंदीरात रामजन्म सोहळा मोठ्या दिमाखात व भक्तिमय वातावरणात पार पडला.
शेकडो भाविकांनी विशेषतः महिलांनी राम मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. येथील राम मंदिराची स्थापना गावातील नागरिक व महादेव कुलकर्णी यांनी केली होती. तेव्हापासून या मंदिराच्या पूजेचे कामकाज मनोहरपंत कुलकर्णी यांच्या कुटुंबातील सदस्य पाहत आहेत.
चंद्रकांत महाराज वेळापूर यांच्या कीर्तनाने आणि गायनाने रामजन्माचे महत्त्व उपस्थित भाविकांना सांगत रामजन्म सोहळा साजरा करण्यात आला. रामजन्माचे स्वागत आंबेठाण पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिक, तरुण व महिला भाविकांनी मंगलमय वातावरणात राममंदिरात दर्शन घेऊन केले.
रामजन्म सोहळ्याचे गावातील ग्रामस्थ व श्रीराम तरुण मंडळाने चोख नियोजन केले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com