
सावरदरीच्या सरपंचपदी मीरा कदम बिनविरोध
आंबेठाण, ता. १ : सावरदरी (ता.खेड) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मीरा अंकुश कदम यांची बिनविरोध निवड झाली. मावळते सरपंच भरत तरस यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली. कदम यांनी यापूर्वी ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच म्हणून काम पाहिले आहे. यावेळी सभागृहात नवनिर्वाचित सरपंच मीरा कदम, मावळते सरपंच भरत तरस, उपसरपंच नीता शेटे, संदीप पवार, संदीप मेंगळे, ताराबाई शेटे, बारकाबाई गावडे, पोलिस पाटील राहुल साकोरे, उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून चाकणचे मंडलाधिकारी गणेश सोमवंशी यांनी काम पाहिले. त्यांना तलाठी सतीश पवार, ग्रामसेवक श्रीधर नाईकडे, दीपक गायकवाड यांनी मदत केली. यावेळी मंडलअधिकारी गणेश सोमवंशी, माजी सरपंच भरत तरस, नवनिर्वाचित सरपंच मीरा कदम, संदीप पवार यांनी मनोगत व्यक्त केले. निवडणूक प्रसंगी सोमनाथ तरस, सुनील बुचुडे, तुकाराम सोनवणे, भगवंत शिंदे, बाळासाहेब बोत्रे, श्रीहरी सोनवणे, संदीप गाढवे, रवींद्र बुचुडे, अतुल हंबीर, चांगदेव कदम यांनी प्रयत्न केले. संतोष शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. तर मछिंद्र शेटे यांनी आभार मानले.