‘रेडिमिक्स’ ठरतोय अपघाताला निमंत्रण

‘रेडिमिक्स’ ठरतोय अपघाताला निमंत्रण

आंबेठाण, ता. १४ : सिमेंट रस्ते, औद्योगिक आणि रहिवासी भाग असलेल्या ठिकाणी बांधकामासाठी सिमेंट आणि खडीचा तयार माल मोठ्या प्रमाणात वापरला जातो. परंतु गाड्यांमध्ये उरलेला हा माल वाहनचालक वर्दळीच्या ठिकाणी टाकून देतात. त्यामुळे ही ठिकाणे अपघाताला निमंत्रण देणारी ठरत आहेत, अशा वाहनचालकांवर किंवा रेडिमिक्स प्लांट चालकांवर कारवाई करण्याची मागणी वाहनचालक, नागरिकांकडून होत आहे.
सध्या चाकण एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. त्यासाठी सिमेंट, खडी तसेच क्रश सॅन्डचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यात आधुनिक पद्धतीने हा माल रेडिमिक्स प्लांटवर एकत्र केला जातो आणि गाड्यांद्वारे त्याची वाहतूक केली जाते. हा माल गाडीतून खाली झाल्यानंतर गाडी आतून स्वच्छ करावी लागते. यासाठी गाडीत शिल्लक राहिलेला माल वाहनचालक रस्त्याच्या कडेला टाकून देतात. माल सिमेंट मिक्स असल्याने तो तत्काळ कडक होतो. अनेक वेळा रस्त्याच्या कडेला गाड्या उभ्या करून हा माल टाकला जातो. त्यामुळे कधी रस्त्याच्या कडेला, तर काही वेळेस डांबरी रस्त्यावर हा माल पडलेला दिसतो. परिणामी वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. तसेच रस्त्यात मोठे ढीग तयार झाल्याने वाहनचालकांना अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात होत आहेत.
अनेक वेळा हा माल साईडपट्ट्यावर टाकला जातो. त्यामुळे वाहनचालकांना साईडपट्ट्या वापरता येत नाहीत. बऱ्याच वेळा वाहने ओव्हरटेक करताना यावरून गाड्या गेल्याने अपघात होतात.
अशाप्रकारे सिमेंटचा माल रस्त्याच्या कडेला टाकणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करावी किंवा रेडिमिक्स प्लांट चालकांना योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी वाहनचालक, नागरिकांकडून केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com