
गोनवडी येथे संगीत भजन स्पर्धा उत्साहात
आंबेठाण, ता. २८ : आदर्श कृषीग्राम गोनवडी ( ता.खेड ) येथे झालेल्या संगीत भजन स्पर्धेत केंदूर (ता. शिरूर) येथील स्वरनारायणी भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. गोनवडी येथे बापूजीबुवा तरुण मंडळ आणि बापूजीबुवा भजनी मंडळ यांच्या माध्यमातून आयोजित संगीत भजन स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
उत्तर पुणे जिल्ह्यासह मावळ आणि नेवासा तालुक्यातील सुमारे २६ भजनी मंडळांनी यात सहभाग घेतला. बापूजी बुवा मंदिराच्या प्रांगणात स्वामी समाधिस्थ महाराजांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धांचे आयोजन केले होते. यात प्रथम क्रमांक स्वरनारायणी भजनी मंडळ (केंदूर) यांनी मिळविला. दुसरा क्रमांक गुनाट (ता. शिरूर) येथील दत्त प्रासादिक भजनी मंडळ. तिसरा क्रमांक ताजे (ता. मावळ) येथील ताजुसई बाल भजनी मंडळाने मिळविला आहे. विजेत्या भजनी मंडळांना रोख रक्कम आणि ट्रॉफी देण्यात आल्या.
संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनेश मोहिते, सरपंच संदीप मोहिते, मोतीराम मोहिते, वसंत तनपुरे, दिलीप काळूराम मोहिते, प्रदीप मोहिते, विजय तनपुरे, अक्षय मोहिते, विकी मोहिते, दिनेश हिरामण मोहिते, धनंजय तनपुरे, संदीप बाळासाहेब मोहिते आदींनी परिश्रम घेतले.
स्पर्धेसाठी सरपंच संदीप मोहिते यांनी ट्रॉफी उपलब्ध करून दिल्या. दिनेश ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले. दिनेश मोहिते यांनी आभार मानले.
स्पर्धेतील वैयक्तिक विजेते
-उत्कृष्ट पखवाजवादक : हर्षद गोरे (पांडुरंग भजनी मंडळ)
-उत्कृष्ट तबलावादक : नामदेव साकोरे (स्वरनारायणी भजनी मंडळ)
-उत्कृष्ट गायक : विजय कांबळे (स्वरनारायणी भजनी मंडळ)
-उत्कृष्ट बालगायिका : आकांक्षा आणि अंकिता गव्हाणे (ताजुबाई बाल भजनी मंडळ)
- उत्कृष्ट हार्मोनिअम वादक : बाबू (पीरसाहेब भजनी मंडळ, निरगुडसर)