माऊली प्रतिष्ठानच्या वतीने गरजूंना कपडे वाटप

माऊली प्रतिष्ठानच्या वतीने गरजूंना कपडे वाटप

आंबेठाण, ता. ८ : शिवे (ता.खेड) परिसरातील कातकरी वस्तीतील गरजूंना राजगुरुनगर येथील माऊली सेवा प्रतिष्ठानच्या वतीने कपडे वाटप करण्यात आले. राजगुरुनगर शहरातील व अन्य गावांतील नागरिकांचे सुस्थितीतील वापरण्यायोग्य असलेले कपडे गोळा करून वाटप करण्यात आले.
मागील एक महिन्यापासून जमा झालेल्या २५ पोती कपड्यांचे वाटप सोमवारी (ता. ८) शिवे परिसरातील कातकरी वस्तीतील गरजूंना केले. कपडे मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. यावेळी जवळपास ४० कुटुंबातील १६० महिला, पुरुष आणि मुलांना कपड्यांचे वाटप करण्यात आले.
राजगुरुनगर येथील नागरिकांकडून वापरण्यायोग्य योग्य कपडे माऊली सेवा प्रतिष्ठानच्या वतीने माध्यमातून जमा करण्यात येतात. त्याचे योग्य पद्धतीने नियोजन करून सर्व कपड्यांची विभागणी केली जाते. ते खेड तालुक्यातील गरजूंना वाटप केले जातात.
याप्रसंगी माऊली सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कैलास दुधाळे, ठाकरवाडी शाळेचे मुख्याध्यापक संजय घुमटकर, माजी उपसभापती चांगदेव शिवेकर, ज्ञानेश्वर शिवेकर, अक्षय शिवेकर, मयूर मोरे, रमेश सोनवणे, साहेबराव कोळेकर, बबन सातपुते, नामदेव शिवेकर, तुकाराम शिवेकर, संतोष सोनवणे, लहू सातपुते सामाजिक कार्यकर्ते संतोष गांधी, दीपाली शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
मयूर मोरे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com