आंबेठाण- बोरदरा रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

आंबेठाण- बोरदरा रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

आंबेठाण, ता. १४ : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. पुढील काळात देखील विकास प्रक्रियेत मागे राहिलेल्या गावांना न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असे मत पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शरद बुट्टेपाटील यांनी आंबेठाण (ता. खेड) येथे व्यक्त केले.
आंबेठाण येथे जिल्हा वार्षिक योजनेतून होत असलेल्या आंबेठाण ते बोरदरा या रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. या कामासाठी ३०५४ लेखाशीर्षमधून १५ लाख रुपये तर राज्याच्या अर्थसंकल्पातून ७५ लाख रुपये मंजूर झाले आहे.
या प्रसंगी आंबेठाणच्या सरपंच संघमित्रा नाईकनवरे, उपसरपंच ज्योती मांडेकर, बोरदराचे सरपंच किरण पडवळ, उपसरपंच योगिता पडवळ, लक्ष्मण भालेराव, तुळसाबाई घाटे, आहिल्या पडवळ, अमोल दवणे, रूपाली गोणते, अध्यक्ष अशोक मांडेकर, दत्ताजी चव्हाण, दीपक मांडेकर, इंदूबाई पडवळ, जयसिंग चव्हाण, पोलिस पाटील तृप्ती मांडेकर, गोविंद घाटे, मोहन घाटे, भानुदास बुट्टे, शिवाजी भेगडे, संदीप दवणे, बापू दवणे, दत्ता पडवळ, ग्रामविकास अधिकारी रवींद्र उगले यांच्यासह स्थानिक पदाधिकारी,ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी शरद बुट्टेपाटील म्हणाले, चंद्रकांतदादा पाटील यांचा कोथरूड हा विधानसभा मतदारसंघ महानगरपालिकेत येत असल्याने जिल्हा वार्षिक योजनेतील निधीची त्यांना आवश्यकता नाही. त्यामुळे निधी वाटपात कोणताही स्वार्थ न साधता आणि भेदभाव न करता त्यांनी पुणे जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांना सर्व योजनांमध्ये समान न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे ज्या तालुक्यांना यापूर्वी निधी मिळत नव्हता अशा तालुक्यांना देखील आता निधी मिळाला आहे.’’
मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधांसाठी अनुदान योजनेमध्ये पाच हजार लोकसंख्येच्या पुढील ग्रामपंचायतीला निधी मिळत होता. आताच्या शासनाने तो निर्णय बदलल्याने आता ३ हजार लोकसंख्येच्या पुढील ग्रामपंचायतीला देखील या योजनेतून निधी मिळणार आहे. त्यामुळे नागरिकरण वाढत असलेल्या गावांना विकास प्रक्रियेसाठी अधिक निधी उपलब्ध होईल अशी माहिती देखील बुट्टेपाटील यांनी दिली.
यावेळी आंबेठाणचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य दत्तात्रेय मांडेकर यांनी प्रास्ताविक केले. तर माजी सरपंच अशोक मांडेकर यांनी सर्वांचे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com