
वराळे येथे आदिवासींना जातीच्या दाखल्यांचे वितरण
आंबेठाण, ता.१८ : वराळे (ता. खेड) येथे आदिवासी समाजातील नागरिकांना जातीचे दाखले काढून देण्यासाठी घेण्यात आलेल्या शिबिर आयोजित केले होते. यावेळी जमा केलेल्या कागदपत्रांच्या आधारे १४४ नागरिकांना जातीचे दाखले वाटप करण्यात आले. चार महिन्यांपूर्वी पाईट येथे शिबिर घेऊन या दाखल्यांसाठी कागदपत्रे जमा करण्यात आली होती. यावेळी आदिवासी समाजातील ठाकर, तेली, भोई, नवबौद्ध आदी समाजातील नागरिकांना जातीचे दाखले वाटप करण्यात आले.
जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार महाराजस्व अभियानांतर्गत खेड तालुक्यातील पश्चिम भागात पाईट येथे १६ फेब्रुवारी रोजी जातीचे दाखले काढून देण्यासाठी शिबिर घेण्यात आले होते. यावेळी जवळपास ४०० नागरिकांनी जातीचा दाखला मिळावा. यासाठी अर्ज केला होता. त्या दाखल्यांचे वितरण बुधवारी ( ता. १७ ) वराळे ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले.
यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शरद बुट्टेपाटील, अप्पर तहसीलदार हर्षल सुळ, पाईटचे मंडलअधिकारी राजेंद्र वाघ, चाकणचे मंडलअधिकारी गणेश सोमवंशी, वराळेच्या सरपंच पूजा बुट्टेपाटील, उपसरपंच बाळासाहेब ठाकर, तलाठी बंडेश आवटे, रौधळवाडीचे सरपंच भरत रौधळ, सुनील देवकर, दत्तात्रेय मांडेकर, सुरेश काळे, रोहित डावरे, नितीन वाघमारे, गणेश कडलग, आकाश मेंगळे, कैलास गावडे, ग्रामसेवक विकास विशे, रोहकलच्या सरपंच प्रमिला काचोळे, किसन आवारी आदी उपस्थित होते.
दरम्यान, नितीन वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले.
02634