करंजविहिरे पर्यंत बससेवा सुरू करण्याची मागणी

करंजविहिरे पर्यंत बससेवा सुरू करण्याची मागणी

आंबेठाण, ता. ९ : वासुली फाटा (ता. खेड) पर्यंत सुरू झालेली पीएमपीएमएल बससेवा करंजविहिरे (ता. खेड) पर्यंत सुरू करावी अशी मागणी नगरसेवक उत्तम केंदळे आणि वहागवाचे उपसरपंच किसन नवले यांनी केली आहे.

खेड तालुक्यातील वासुली फाटा या भागात यापूर्वी भोसरी-चाकण मार्गे बससेवा आणि निगडी येथून बससेवा सुरू करण्यासाठी उत्तम केंदळे यांनी पाठपुरावा केला असून त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले होते. किसन नवले यांनी पीएमपीएमएलच्या मुख्य कार्यालयात निवेदन देऊन करंजविहिरेपर्यंत बस सुविधा चालू करण्याची मागणी केली आहे. यावेळी वाहतूक नियोजन अधिकारी विजय रांजणे, चव्हाण, वाहतूक नियोजन विभागाचे मुख्य अभियंता नवनाथ बढे, सरपंच सुदाम पवार, उपसरपंच किसन नवले, संदीप पानमंद आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com