इनामगावात शेतकऱ्याच्या धाडसाने बिबट्या जेरबंद
मांडवगण फराटा, ता.२४ : शिरूर तालुक्यातील इनामगाव येथे शेतकऱ्याच्या धाडसाने बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात यश आले. शुक्रवारी (ता.२४) सकाळी सातच्या सुमारास नलगे मळा परिसरातील शेतात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
इनामगाव हद्दीतील नलगेमळा येथील शेतकरी सुरेश मचाले हे पत्नीसह सकाळी जनावरांना चारा आणण्यासाठी ट्रॅक्टरने शेतात गेले होते.यावेळी कोंबडी ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांनी उसाच्या शेतात असलेल्या पिंजऱ्याकडे पाहिले. त्या वेळी अर्धवट उघड्या पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याचे त्यांना दिसले. क्षणाचाही विलंब न करता मचाले यांनी ट्रॅक्टर पिंजऱ्यासमोर आडवा लावला. त्यामुळे पिंजरा पूर्णपणे बंद झाला आणि बिबट्याला बाहेर पडणे अशक्य झाले. त्यांच्या या तत्परतेमुळे गावातील मोठी दुर्घटना टळली. “पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या नर असून वय अंदाजे सहा ते सात वर्षे आहे.त्याला सुरक्षितरीत्या पकडून माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले आहे,”असे वनपरिक्षेत्र अधिकारी नीलकंठ गव्हाणे यांनी सांगितले.
02459
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

