मरकळ ग्रामपंचायत सरपंचपदी अमोल लोखंडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मरकळ ग्रामपंचायत सरपंचपदी अमोल लोखंडे
मरकळ ग्रामपंचायत सरपंचपदी अमोल लोखंडे

मरकळ ग्रामपंचायत सरपंचपदी अमोल लोखंडे

sakal_logo
By

आळंदी, ता. ३० : मरकळ ग्रामपंचायत सरपंचपदी अमोल लोखंडे तर उपसरपंचपदी नयना वर्पे यांची निवड झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता डामसे यांनी दिली. डिसेंबरपासून सरपंच उपसरपंच दोन्ही पदे रिक्त होती. सरपंच पद हे मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे. मात्र आधीच्या सरपंचांनी राजीनामा दिल्यास किंवा मृत्यू झाल्यास हे पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले. त्याच्या निवडणुकीचे आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी काढले. दोन्ही पदासाठी प्रत्येकी दोन दोन नामांकन अर्ज आले होते. अमोल लोखंडे यांना आठ तर रामदास लोखंडे यांच्या बाजूने सात सदस्यांनी मतदान केले. उपसरपंचपदासाठी नयना वर्पे यांना आठ तर वैशाली लोखंडे यांना सात सदस्यांना मतदान केले. यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी जोशी यांनी बहुमताद्वारे अमोल लोखंडे यांची सरपंच तर नयना वर्पे यांची उपसरपंच पदी निवड केली.

Web Title: Todays Latest District Marathi News Ald22b01387 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top