आळंदीत सामाजिक सलोखा उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळंदीत सामाजिक सलोखा उपक्रम
आळंदीत सामाजिक सलोखा उपक्रम

आळंदीत सामाजिक सलोखा उपक्रम

sakal_logo
By

आळंदी, ता. ७ ः सामाजिक सलोख्याचे भान राखून नियोजनबद्ध, शिस्त आणि एकमेकांबाबत आदरभाव ठेवून गेल्या महिन्याभरात विविध जातिधर्मांचे उत्सव आळंदीकरांनी एकत्रित साजरे केले. सध्या राज्यातील घडामोडी पाहता आळंदीकरांनी दाखवलेले सामाजिक औदार्य आणि आळंदीकरांच्या विविध उत्सवांच्या आयोजनाने भारावलेल्या आळंदी पोलिसांनी विविध जातिधर्मांच्या उत्सव कमिटीतील पदाधिकाऱ्यांचा सन्मान केला.
यावेळी प्रमुख पाहुणे आळंदी देवस्थानचे विश्वस्त डॉ. अभय टिळक, आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक ज्ञानेश्वर साबळे, माजी नगरसेवक डी. डी. भोसले, प्रकाश कुऱ्हाडे, प्रशांत कुऱ्हाडे, अजित वडगावकर, उषा नरके, मालन घुंडरे, मच्छिंद्र शेंडे, सय्यद निस्सार, कृपाली गायकवाड आदी उपस्थित होते.
सर्वधर्मीय सामाजिक सलोखा या आशयाखाली आज सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा आळंदी पोलिस ठाण्याच्यावतीने सन्मान करण्यात आला. तर यावेळी आळंदी पोलिसांनी महिन्याभरात विविध सण आणि उत्सव काळात शांतता ठेवण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले, म्हणून आळंदी देवस्थान आणि सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांचा सन्मान केला.

2572

Web Title: Todays Latest District Marathi News Ald22b01391 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top