माउलींच्या पालखीचे २१ जून रोजी प्रस्थान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माउलींच्या पालखीचे
२१ जून रोजी प्रस्थान
माउलींच्या पालखीचे २१ जून रोजी प्रस्थान

माउलींच्या पालखीचे २१ जून रोजी प्रस्थान

sakal_logo
By

आळंदी, ता. ९ : पायी आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा परंपरेने ज्येष्ठ वद्य अष्टमीला (ता. २१ जून) आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. सोहळा ९ जुलैला पंढरीत पोचणार असून, मुख्य आषाढी एकादशी १० जुलैला आहे. सोहळ्यात तीन उभे रिंगण, चार गोल रिंगणे होणार आहेत. तिथीची वृद्धीमुळे लोणंदमध्ये अडीच दिवस, पुणे, सासवड, फलटणमधे प्रत्येकी दोन दिवस सोहळा मुक्कामी राहील, अशी माहिती पालखी सोहळाप्रमुख अॅड. विकास ढगे यांनी दिली.
संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आळंदीतून २१ जूनला सायंकाळी चारनंतर प्रस्थान ठेवल्यानंतर पहिला मुक्काम आळंदीतच नविन दर्शन मंडपात राहील. बुधवारी (ता. २२) सकाळी आळंदीतून सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होऊन पुण्यात दोन दिवसांच्या मुक्कामी राहील. सासवडला (ता. २४ व २५ जून), जेजुरीला (ता. २६ जून), वाल्हे येथे (ता. २७ जून), असा प्रवास करून सोहळा नीरास्नान झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील लोणंद येथे (ता. २८ व २९ जून) अडीच दिवसांच्या मुक्कामी पोहचेल. दुपारच्या जेवणानंतर लोणंदपासून पुढे चांदोबाचा लिंबला सोहळ्यातील पहिले उभे रिंगण करून पालखी तरडगाव (ता. ३० जून) मुक्कामी जाईल. फलटणला (ता. १ व २ जुलै), बरड (ता. ३ जुलै), नातेपुते येथे (ता. ४ जुलै) मुक्कामानंतर पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण करून सोहळा माळशिरस येथे (ता. ५ जुलै) मुक्कामी राहील. खुडुस फाटामध्ये सकाळचे दुसरे गोल रिंगण करून दुपारी धावाबावी माऊंटमधील भारूडानंतर सोहळा वेळापूर (ता. ६ जुलै) मुक्कामी जाईल. ठाकूरबुवाची समाधी येथे सोहळ्यातील तिसरे गोल रिंगण व दसुर फाटा येथील टप्पा येथे संत सोपानदेव व माउलींच्या बंधूभेटीनंतर भंडीशेगाव (ता. ७ जुलै) मुक्काम असेल. भंडिशेगावच्या जेवणानंतर वाखरीतील (ता. ८) दुसरे उभे रिंगण आणि चौथे गोल रिंगणानंतर सोहळा वाखरी मुक्कामी राहील. वाखरीतील दुपारच्या जेवणानंतर तिसरे उभे रिंगण आणि पादुकांजवळ आरती झाल्यानंतर सोहळा पंढरपूरला (ता. ९) प्रवेश करेल.

२३ जुलैला परत आळंदीत
आषाढी एकादशीला (ता. १० जुलै) नगरप्रदक्षिणा, माउलींचे चंद्रभागा स्नान, असा कार्यक्रम आहे. त्यानंतर १३ जुलैला माउलींचे चंद्रभागास्नान, विठ्ठल-रुक्मिणी भेट, गोपाळपूर काला होईल. त्याल्यानंतर आळंदीच्या दिशेने सोहळा माघारी येणार आहे. २३ जुलैला सोहळा आषाढी वारी करून आळंदीत पोहचेल.

सोहळ्यातील रिंगणे व ठिकाण
१) पहिले उभे रिंगण- चांदोबाचा लिंब
२) पहिले गोल रिंगण- पुरंदवडे
३) दुसरे गोल रिंगण- खुडुस फाटा
४) तिसरे गोल रिंगण- ठाकुरबुवाची समाधी
५) दुसरे उभे रिंगण- बाजिरावची विहीर वाखरी
६) चौथे गोल रिंगण- बाजीरावची विहीर वाखरी
७) तिसरे उभे रिंगण- पादुकांजवळ पंढरपूर प्रवेशापूर्वी.

Web Title: Todays Latest District Marathi News Ald22b01393 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top