आळंदीतील अतिक्रमणे जमीनदोस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळंदीतील अतिक्रमणे जमीनदोस्त
आळंदीतील अतिक्रमणे जमीनदोस्त

आळंदीतील अतिक्रमणे जमीनदोस्त

sakal_logo
By

आळंदी, ता. १० : आषाढी वारीच्या पार्श्‍वभूमीवर रस्ता व पदपथावरील बेकायदा टपरी हातगाडीची अतिक्रमणे आळंदी पालिकेने थेट जेसिबी लावून जमीनदोस्त केली.
आळंदी शहरात अतिक्रमणाचे पेव फुटले होते. त्यामुळे पदपथावर तर चालताही येत नव्हते. याबाबत सामाजिक कार्यकर्ते व नागरिक वारंवार अतिक्रमणांवर कारवाईची मागणी करत होते. अखेर पालिकेने मंगळवारी (ता. १०) जेसीबी लावून हातगाड्या व टपऱ्या काढल्या. खासकरून पालिका चौक, पुणे-आळंदी रस्ता, भैरोबा चौकात पालिकेने हातगाड्या खाद्यपदार्थाचे स्टॉल हटविले.
चाकण चौक शाळेसमोरील पदपथावर नव्याने झालेल्या टपऱ्याही हटविल्या. त्यामुळे या रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. आता मंदिराकडे येणारे मार्ग, शनिमंदीर रस्ता, भराव रस्ता, मरकळ रस्ता या ठिकाणी रस्त्यातील अतिक्रमणांवर कारवाई केली जाणार आहे. अनधिकृत शेडबांधकाम करून अनेकांनी व्यावसायिक गाळे बांधले. त्यावर पालिकेचा हातोडा फिरणार आहे.

सतत कारवाई करणार : मुख्याधिकारी
याबाबत मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले की, आता सतत अतिक्रमण विरोधी कारवाई केली जाईल. खासकरून पदपथ मोकळे केले जातील. मंदिर परिसरातही रस्त्यावरील व पेढेवाल्यावर कारवाई करून माल जप्त केला जाईल. स्वेच्छेने अतिक्रमण काढून घेण्याबाबत पालिकेने अगोदरच सूचित केले होते. काहींनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

Web Title: Todays Latest District Marathi News Ald22b01396 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top