आळंदीत ‘भटकंतीच्या पाऊलखुणा’चे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळंदीत ‘भटकंतीच्या पाऊलखुणा’चे प्रकाशन
आळंदीत ‘भटकंतीच्या पाऊलखुणा’चे प्रकाशन

आळंदीत ‘भटकंतीच्या पाऊलखुणा’चे प्रकाशन

sakal_logo
By

आळंदी, ता. १० : आळंदीतील नामदेव गायकवाड यांनी लिहिलेल्या भटकंतीच्या पाऊलखुणा या प्रवास वर्णन पुस्तकाचे प्रकाशन अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांच्या हस्ते झाले. मसाप चाकण शाखेचा साहित्य गौरव पुरस्कार सोहळा नुकताच मैत्री सभागृह शिवाजी विद्यामंदिर चाकण येथे घेण्यात आला. त्यामध्ये शाखेच्या वतीने नामदेव गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी माजी शिक्षण संचालक शशिकांत हिंगोणेकर, माजी उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ चव्हाण, पिंपरी-चिंचवड मसापचे अध्यक्ष, कवी कट्ट्याचे संचालक राजन लाखे, मसाप चाकण अध्यक्ष मधुकर गिलबिले, खेड मसाप अध्यक्ष संतोष गाढवे, पदवीधर संघटनेचे तालुकाध्यक्ष नारायण करपे, नायब तहसीलदार अनुराधा माने उपस्थित होते. सदानंद मोरे यांनी गायकवाड यांना पुढील लेखनासाठी शुभेच्छा दिल्या.

Web Title: Todays Latest District Marathi News Ald22b01397 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top