देहविक्रय करणाऱ्यांचा आळंदी परिसरात उपद्रव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देहविक्रय करणाऱ्यांचा 
आळंदी परिसरात उपद्रव
देहविक्रय करणाऱ्यांचा आळंदी परिसरात उपद्रव

देहविक्रय करणाऱ्यांचा आळंदी परिसरात उपद्रव

sakal_logo
By

आळंदी, ता. ११ : दिघी आणि आळंदी पोलिस ठाण्याअंतर्गत आळंदी शहरात गरुड स्तंभ ते देहू फाटा आणि चाकण चौक ते हनुमानवाडी परिसरात रस्त्यावर उभे राहत असलेल्या देहविक्रय करणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे. त्यांचा येणाऱ्या-जाणाऱ्यांना उपद्रव होत आहे. खुलेआम बेकायदा धंदा आणि अनधिकृतपणे लॉजिंग व्यवसायामुळे आळंदीतील सर्वसामान्य महिला व विद्यार्थ्यांची मात्र कुचंबणा होत आहे.
गेली पंधरा वर्षात लॉजिंगवर चालणाऱ्या अनधिकृत व्यवसायामुळे आळंदी बदनाम होऊ लागली आहे. गरुडस्तंभ ते देहू फाटा परिसर, चऱ्होली खुर्द ते चऱ्‍होली बुद्रुक बायपास मार्ग, आळंदी फाटा, धानोरे औद्योगिक भाग, हनुमानवाडी येथे लॉजिंगचे व्यवसाय तेजीत आहे. रस्त्यावर उभे राहून पांथस्थांना देहविक्रय करणाऱ्या महिला हातवारे करतात. खास करून चाकण चौक ते देहू फाटा येथील रस्त्यावर या महिला फिरत असतात. परिणामी घरगुती कामानिमित्त, भाजीमंडईत खरेदीसाठी किंवा शाळा, शिकवणीसाठी जाणाऱ्या महिला व मुलींचीही गाडीवरून फिरणारे आंबट शौकीन छेड काढत असल्याचे चित्र आहे.
देहविक्रय करणाऱ्या महिला मद्य प्राशन करून गिऱ्हाईकावरून आपसांत भांडण करत शिवीगाळ करतात. तसेच, कधी उभे राहण्याच्या जागेवरून भांडतात. याचबरोबर संबंधित महिला आणि पुरुषांना लॉजवर नेण्यावरून रिक्षावालेही भांडत असतात.
आध्यात्मिक आळंदीत जाताना या अवैध व्यवसायामुळे ओंगळवाणे दृश्य पाहावे लागते. पोलिस अधूनमधून लुटुपुटूची कारवाई करतात. मात्र, या भागात कायमस्वरूपी दिवसा आणि रात्री स्वतंत्र महिला पोलिसांच्या गस्तीची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Ald22b01398 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top