वारकऱ्यांच्या सुविधांसाठी समन्वय ठेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वारकऱ्यांच्या सुविधांसाठी समन्वय ठेवा
वारकऱ्यांच्या सुविधांसाठी समन्वय ठेवा

वारकऱ्यांच्या सुविधांसाठी समन्वय ठेवा

sakal_logo
By

आळंदी, ता. ११ : येथे दोन वर्षांच्या अंतराने भरणाऱ्या यंदाच्या वर्षीची आषाढी वारीत वारकऱ्यांची संख्या लक्षणीय असण्याची शक्यता आहे. वारकऱ्यांना सुविधा पुरवण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी एकमेकांशी समन्वय ठेवून यात्रा सुरळीत पार पाडण्याचे आवाहन प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांनी केले.
प्रांताधिकारी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली यात्रा नियोजन आढावा बैठक बुधवारी (ता. ११) झाली. पालखी सोहळाप्रमुख अॅड. विकास ढगे, तहसीलदार वैशाली वाघमारे, पोलिस उपायुक्त प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, प्रकाश जाधव, रवींद्र जाधव, मुख्याधिकारी अंकुश जाधव, पालखी सोहळामालक बाळासाहेब आरफळकर, मारुती कोकाटे, संतोष भोसले यांच्यासह सर्व शासकीय अधिकारी यांची उपस्थिती होती.
यावेळी प्रांताधिकारी चव्हाण म्हणाले, ‘‘कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर पंढरपूर-भीमाशंकर यात्रेला भाविकांची मोठी गर्दी होती. त्यामुळे आळंदीत अडीच लाख वारकरी येण्याची शक्यता धरुन सुविधा पुरवण्याचे नियोजनात काटेकोरपणा हवा. सुविधा पुरविताना आळंदीसह लगतच्या गावांचाही विचार करावा. कारण, या भागातही दिंड्या असतात.’’

या सुविधा पुरविणार
- वारकऱ्यांना सुविधा पुरविण्यासाठी सर्व शासकीय विभागांचा एक प्रतिनिधी पालिकेच्या मध्यवर्ती आपत्कालीन मदत केंद्र व नियंत्रण कक्षात चोवीस तास तैनात असेल.
- शहरात विविध ठिकाणी सहा मदत केंद्रे असतील.
- वारी काळात वारकऱ्यांना गॅस वितरण सुलभ होण्यासाठी तलाठी व ग्रामसेवकांची नेमणूक केली जाईल. वारीच्या पूर्वी तीन दिवस आधी गॅस सिलिंडर उपलब्ध होतील.
- दिंडीचा प्रवेश करताना आळंदीत पोलिसांकडून जेवण आणि तंबू साहित्य वाहनाची अडवणूक होणार नाही.
- पाण्यासाठी दिंड्यांना टॅंकरही ठेवले आहेत. पाणी पुरवठा शुद्ध आणि चोवीस तास पुरवला जाईल.
- आळंदीला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांची दुरुस्ती केली जाईल.

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
१) दर्शन बारीसाठी नदीपलीकडे जागा १८ ते २२ जून या काळासाठी ताब्यात घ्यावी.
२) प्रदक्षिणा रस्ता आणि मंदिर परिसरात सरसकट अतिक्रमण कारवाई
३) वारकऱ्यांना १५ जूनपासून गॅससिलेंडर पुरवठा.
४) हॉटेल व पाणी पुरवणाऱ्या जारची तपासणी आवश्यक.
५) भामा आसखेड पाणी पिण्यासाठी चोवीस तास पुरवठा.
६) स्नानासाठी इंद्रायणीत चांगले पाणी सोडले जाईल.
७) संशयास्पद हालचाली टिपण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा तैनात.

Web Title: Todays Latest District Marathi News Ald22b01399 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top