आळंदीत शालेय विद्यार्थ्याचे आठवड्यात दोनदा लसीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळंदीत शालेय विद्यार्थ्याचे
आठवड्यात दोनदा लसीकरण
आळंदीत शालेय विद्यार्थ्याचे आठवड्यात दोनदा लसीकरण

आळंदीत शालेय विद्यार्थ्याचे आठवड्यात दोनदा लसीकरण

sakal_logo
By

आळंदी, ता. १२ : येथील एका शाळेत सातवीतील विद्यार्थ्याचे पालकांना पूर्वकल्पना न देताच आठवड्यात दोनदा कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले. याबाबत पालकांनी स्थानिक ग्रामिण रूग्णालय आणि संबंधित शाळेत याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पालकांनी वरिष्ठ विभागाकडे तक्रार केली.
सध्या शालेय विद्यार्थ्यांना लसीकरण केले जात आहे. ग्रामिण रूग्णालय आणि संबंधित शाळा शालेय स्तरावर स्वतंत्रपणे विद्यार्थ्यांचे लसीकरण करत आहेत. आळंदीतील संबंधित पालकाचा मुलगा सातवी इयत्तेत शिकत आहे. त्याने १९ मार्च रोजी कोरोना प्रतिबंधक लस आळंदी ग्रामिण रूग्णालयात घेतली होती. त्याची रीतसर नोंदणी होऊन प्रमाणपत्रही मिळाले. प्रमाणपत्रानुसार दुसरा डोस १६ एप्रिलनंतर होता. मात्र, संबंधित शाळेने मात्र सामुहिक लसिकरणाबाबत कोणतीच पूर्वकल्पना न देताच २५ मार्चला लसीकरण केले. आठवड्यातच एकाच विद्यार्थ्याला दोनदा लसीकरण झाले. याबाबत पालकांनी शाळा व्यवस्थापनास जाब विचारला असता उडवाउडवीची उत्तरे दिली. याबाबत त्यांनी तक्रार केली.

संबंधित विद्यार्थ्याला दोनदा लसीकरण झाले. याबाबत पालिका, ग्रामिण रूग्णालयाचे आणि शाळेचे शिक्षकांचे जबाब घेऊन वरिष्ठ कार्यालयाकडे कळविले आहे. पालिका कर्मचारी आणि शिक्षक जबाबदारी चालढकल करत आहेत. वरिष्ठ कार्यालयाकडून याबाबत आता निर्णय होईल.
- गणपत जाधव, वैद्यकीय अधिक्षक,
ग्रामिण रूग्णालय, आळंदी (ता. खेड)

Web Title: Todays Latest District Marathi News Ald22b01402 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top