आळंदीत बेकायदा फ्लेक्सवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळंदीत बेकायदा फ्लेक्सवर कारवाई
आळंदीत बेकायदा फ्लेक्सवर कारवाई

आळंदीत बेकायदा फ्लेक्सवर कारवाई

sakal_logo
By

आळंदी, ता. १२ : अनधिकृत टपऱ्या, दुकानांच्या अतिक्रमणांबरोबर पालिका प्रशासनाने आता बेकायदा फ्लेक्सवर कारवाई केली. प्रशासनाने शहरातील दुकाने आणि विद्युत खांबावर लटकवलेले फ्लेक्स हटवून शहर स्वच्छतेच्या राबविलेल्या मोहिमेचे नागरिकांनी कौतुक केले.
आळंदी (ता. खेड) पालिका प्रशासनाने गेल्या तीन दिवसांपासून शहरात ठिकठिकाणचे अनधिकृत बेकायदा स्टॉल, हातगाड्या, टपऱ्यांचे अतिक्रमण थेट जेसीबी लावून काढले. गुरुवारी (ता. १२) देहू फाटा परिसरात कारवाई केली. त्यामुळे येथील रस्ता आता प्रशस्त दिसू लागला. तर, पदपथही मोकळा झाला. स्थानिक राजकीय आशीर्वादाने रस्त्यावर तव पदपथावर थाटलेल्या बेकायदा अतिक्रमणांवर पालिकेने कारवाई केली. देहू फाटा परिसरात अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीही होत होती.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमिवर बुधवारी (ता. ११) झालेल्या प्रशासकीय बैठकीत खेडचे प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांनीही अतिक्रमण कारवाईत सरसकट कारवाईचे सूचक आदेश पालिकेला दिले होते. याबाबत सामाजिक कार्यकर्ते संतोष भोसले यांनी अतिक्रमण कारवाई तोंडे पाहून केल्याची टीका केली होती. याचा परिणाम म्हणून पालिकेने कारवाईत सातत्य ठेवून दुकानांच्या अतिक्रमणांबरोबर रस्त्यावर व रस्त्याकडेला बेकायदा फ्लेक्सबाजीवर कारवाई केली. अनेक ठिकाणचे फ्लेक्स काढून टाकले. विद्युत खांबावर एकाच वेळी चारजणांचे विविध फ्लेक्स अनेक महिन्यांपासून लटकलेले होते. नागरिकांना विनाकारण या लोकांचे तोंडे पाहावी लागत होती. पालिकेच्या या धडक कारवाईमुळे विद्युत खांबावरील विविध जाहिरातींचे फ्लेक्स काढल्याने नागरिकांनी प्रशासनाचे कौतुक केले. अशाच प्रकारची कारवाई फ्लेक्सच्या बाबतीत सातत्य ठेवून करावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

व्यावसायिकांना भडकावण्याचा प्रयत्न
या कारवाईत मुख्याधिकारी अंकुश जाधव यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम विभाग, विद्युत विभाग, आरोग्य विभागाचे कर्मचारी सहभागी होते. जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण आणि फ्लेक्स काढल्यामुळे आणखी काही दिवसांत अतिक्रमण करण्याची हिंमत आता राहणार नसल्याचे चित्र आहे. तरीही काही राजकीय मंडळी पालिका प्रशासनाने केलेल्या या कारवाईविरोधात व्यावसायिकांना भडकावत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Ald22b01403 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top