गुंठेवारी नियमीतीकरणाला थंड प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुंठेवारी नियमीतीकरणाला थंड प्रतिसाद
गुंठेवारी नियमीतीकरणाला थंड प्रतिसाद

गुंठेवारी नियमीतीकरणाला थंड प्रतिसाद

sakal_logo
By

आळंदी, ता.२८ ः आळंदी नगरपालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याच्या उद्देशाने गुंठेवारी नियमितीकरणासाठी नागरिकांकडून प्रस्ताव मागूनही पालिकेच्या आवाहनाला थंड प्रतिसाद मिळत आहे. चार महिन्यात केवळ पंचवीस प्रकरणे पालिकेकडून आली असून त्यापैकी सतरा प्रस्तावांवर गुंठेवारी नियमितीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, प्रस्तावांसाठी पालिकेच्यावतीने ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली असल्याची माहिती मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी दिली.

आळंदी पालिका हद्दीत सध्या सात हजारांहून अधिक मिळकती आहेत. शासनाच्या धोरणानुसार गुंठेवारी नियमितीकरणासाठी आळंदी पालिकेने ३१ मार्चपर्यंत प्रस्ताव दाखल करण्याची मुदत होती. मात्र आता ती वाढवून आता ३० जूनपर्यंत करण्यात आली आहे.
बांधकाम नियमावलीतील जाचक अटींमुळे छोट्या प्लॉटवर पालिकेची परवानगी घेत घरे बांधण्यात अडचणी येत असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी अनधिकृत बांधकामे केली. दिवसेंदिवस अनधिकृत बांधकामाची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
यापैकी जी घरे नियमीत होवू शकतात, त्यांचे नियमीतीकरण करण्यासाठी राज्य शासनाने गुंठेवारी कायद्यान्वये शुल्क आकारण्याचे धोरण जाहीर केले आहे. मात्र पालिकेच्या आवाहनाला नागरिकांकडून थंड प्रतिसाद असल्याचे चित्र आहे. केवळ पंचवीस जणांची पालिकेकडे नियमितीकरणासाठी अर्ज केले. त्यापैकी सतरा प्रकरणे नियमीत केली असून आठ प्रलंबित असल्याचे चित्र आहे.

क्लिष्ट प्रक्रियेचे कारण

दरम्यान, नागरिकांकडून थंड प्रतिसाद मिळण्यास क्लिष्ट प्रक्रिया हेच कारण नागरिकांकडून बोलले जात आहे.अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्यासाठी संबंधित नागरिकाला इंजिनिअरच्या माध्यमातून प्रस्ताव सादर करावे लागतात. मात्र त्यासाठी इंजिनिअर घेत असलेले शुल्क,पालिकेकडून होणारा विलंब यामुळे नागरिक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Ald22b01420 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top