आळंदीकरांमध्ये प्रभागरचनेची उत्सुकता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळंदीकरांमध्ये प्रभागरचनेची उत्सुकता
आळंदीकरांमध्ये प्रभागरचनेची उत्सुकता

आळंदीकरांमध्ये प्रभागरचनेची उत्सुकता

sakal_logo
By

आळंदी, ता.६ : आळंदी नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठीची प्रभाग रचनेची अंतिम अधिसूची उद्या (ता.७) प्रसिद्ध होणार आहे. हरकतींवरील सुनावणीअंती प्रभाग रचनेत नेमके काय बदल होणार याबाबत आता आळंदीकरांत उत्सुकता तर इच्छुकांमध्ये धाकधूक आहे.
पालिकेकडून प्रसिद्ध केलेल्या प्रभाग रचनेवर आळंदीतून सुमारे आठ हरकती गेल्या होत्या. हरकती व सुचनांच्या अनुषंगाने अभिप्राय देवून त्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्यामार्फत ३० मे ला निवडणूक आयुक्तांकडे पाठविण्यात आले. घेतलेल्या हरकतींवर विचार होऊन प्रभाग रचना बदलली जाणार की आहे तसीच रचना असणार आहे. याबाबत मात्र आळंदीकर आणि इच्छुकांची उत्सुकता आहे. वस्तूतः दोन सदस्य पद्धतीने निवडणूक होणार आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार आळंदीची लोकसंख्या अठ्टावीस हजार सहाशे पंचेचाळीस आहे. वाढलेल्या लोकसंख्येमुळे प्रभाग रचनेत वाढ झाली. पूर्वीच्या नऊ प्रभागांऐवजी आता दहा प्रभाग झाले. यामुळे अठरा नगरसेवकांची संख्या तीनने वाढून आता एकवीस सदस्यसंख्या झाली. पहिल्या नऊ प्रभागात प्रत्येकी दोन सदस्यांसाठी आणि उर्वरित एका प्रभागात तीन सदस्यांसाठी निवडणूक होईल.
आळंदी गावठाणात सात प्रभागात चौदा नगरसवेक आणि देहूफाटा येथे तीन प्रभाग सात नगरसेवक निवडून येणार आहेत. यापूर्वी मागील निवडणुकीत भाजपचे दहा नगरसेवक, सेनेचे सहा आणि अपक्ष दोन असे पक्षिय बलाबल होते. नगराध्यक्षही भाजपचाच निवडून आलेला आहे.


आळंदीत शिवसेना गलितगात्र
राष्ट्रवादी काँग्रेस मात्र मागील निवडणुकीत ताकद असूनही निवडणुकीपासून अलिप्त राहिली. यंदा भाजपने सत्ता राखण्यासाठी सभासद नोंदणी बुथनिहाय केली आहे. सेनेत मात्र माजी जिल्हाप्रमुख राम गावडे यांनी लक्ष काढून घेतल्यामुळे आळंदीत शिवसेना गलितगात्र झाली. मात्र, तरीही पक्षाच्या चिन्हावर लढण्यासाठी तयारी केली आहे. राष्ट्रवादीत आमदार दिलीप मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढण्याच्या हालचाली सुरू आहेत. काँग्रेसचे मात्र आळंदीत अस्तित्व नावापुरतेच आहे.

भाजपची निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी
राज्यातील महाविकास आघाडीनुसार स्थानिक पातळीवर सेना राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार की, एकला चलोची भूमिका घेणार याचे सर्व अधिकार सध्या तरी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडेच आहेत. भाजप मात्र सध्या निवडणूकीच्या अनुषंगाने जोरदार तयारीत असल्याचे चित्र आहे. इच्छुकांचे गणित प्रभाग रचनेवर अवलंबून असल्याचे चित्र आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Ald22b01421 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top