
आळंदीत पालखी प्रस्थाननिमित्त लोकशिक्षणाचा अभिनव उपक्रम
आळंदी, ता. १८ : आळंदी (ता. खेड) येथे पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त विश्वशांती केंद्र, माईर्स एमआयटी व आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या वतीने रविवार, (ता. १९) ते मंगळवारपर्यंत (ता. २१) युनेस्को अध्यासन अंतर्गत लोकशाही, मानवाधिकार, शांती व सहिष्णुतेसाठीचा लोकशिक्षणाचा अभिनव उपक्रमाचे आयोजन केले आहे. त्यानिमित्ताने व्याख्यान, प्रवचन, कीर्तन व भक्ती संगीत भजनाचे विविध कार्यक्रम होणार आहेत.
या महोत्सवात सायंकाळच्या साडेपाच ते साडेसहाच्या सत्रात आळंदी येथील आसाराम बडे, सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष भागवताचार्य तुळशीराम गुट्टे, रविदास सिरसाठ यांची प्रवचने होणार आहेत. सायंकाळच्या सात ते नऊच्या सत्रात जालना येथील सुदाम पानेगावकर, भगवतीताई दांडेकर (सातारकर) आणि ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक किसन महाराज साखरे यांची कीर्तने होणार आहेत. तसेच, डॉ. मोरवंचीकर लिखित ‘समाधीतील स्पंदने’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. रोज रात्री सव्वानऊ ते साडेअकराच्या सत्रात अमोल पटवर्धन व कल्याणी शेट्ये आणि आदिनाथ कुटे यांच्या भक्तिसंगीताचा कार्यक्रम होईल. गोदावरीताई मुंडे व रमेश शेनगांवकर, काशिराम इडोळीकर व दिंगबर कुटे यांच्या सांप्रदायिक संगीत भजनाचा कार्यक्रम होईल. राधाकृष्ण गरड यांचा अभंगवाणीचा कार्यक्रम होणार आहे. काकडा आरती, हरिपाठ, भजन व टाळ- मृदंगाची साथ एमआयटी हनुमान भजनी मंडळ, हे करतील, अशी माहिती ‘विश्वशांती केंद्र’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड व आळंदी देहू परिसर विकास समितीच्या समन्वयक प्रा. स्वाती कराड-चाटे यांनी दिली.
Web Title: Todays Latest District Marathi News Ald22b01443 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..